मध्य प्रदेशातील Enigma Automobiles कंपनीने आपली नवीन इलेक्ट्रिक स्कूटर 'Ambier N8' बाजारात आणली आहे.

ही एक हाय-स्पीड इलेक्ट्रिक स्कूटर आहे ज्याची किंमत रु. 1.05 लाख पासून सुरू होते आणि रु. 1.10 लाख (एक्स-शोरूम) पर्यंत जाते.

किंमत आणि रेंजच्या बाबतीत ही स्कूटर बाजारात OLA आणि Ather शी स्पर्धा करेल.

Ambier N8 मध्ये, कंपनीने 1500-वॅटची BLDC इलेक्ट्रिक मोटर वापरली आहे आणि तिचा टॉप स्पीड 40 ते 50 किलोमीटर प्रति तास आहे.

कंपनीचा दावा आहे, ही स्कूटर सिंगल चार्जवर 200 किलोमीटरपर्यंत ड्रायव्हिंग रेंज देते. बॅटरी पूर्णपणे चार्ज होण्यासाठी सुमारे 4 तास लागतात.

Ambier N8 एकूण पाच रंगांमध्ये उपलब्ध आहे, ज्यामध्ये ग्रे, व्हाइट, ब्लू, मॅट ब्लॅक आणि सिल्व्हर कलरचा पर्याय उपलब्ध आहे. ग्राहक कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून ही इलेक्ट्रिक स्कूटर बुक करू शकतात.

अधिक बातम्यांसाठी