Ghee In Navel : रात्री झोपण्यापूर्वी नाभीत सोडा थोडसं तूप, शरीरासाठी ठरेल फायदेशीर!

खोबरेल तेल, मोहरीचे तेल वगैरे घालून नाभीला मसाज करण्याचे फायदे तुम्हाला माहीत असतील, पण नाभीत तूप लावल्याने होणारे फायदे तुम्ही कधी ऐकले किंवा वाचले आहे का?

चला जाणून घेऊया रात्री झोपताना नाभीत तूप लावून कोणत्या शारीरिक समस्यांपासून सुटका मिळते.

नाभीत तूप लावल्याने बद्धकोष्ठता दूर होते.

बद्धकोष्ठतेचा त्रास तुम्हाला नेहमी सतावत असेल तर रात्री झोपण्यापूर्वी नाभीत तूप लावून झोपा. असे केल्याने बद्धकोष्ठतेपासून मुक्ती मिळते.

नाभीत तूप लावल्याने गुडघेदुखी नाहीशी होते

गुडघेदुखी, सूज येण्याची समस्या असल्यास नाभीला तुपाने मसाज करा. शरीरात कुठेही दुखत असल्यास नाभीत तूप लावून मसाज करा.

नाभीत तूप लावल्याने ओठ मऊ होतात

तुमचे ओठ खूप कोरडे राहिल्यास, त्यावर क्रस्ट तयार होत असेल, तर तुम्ही ओठांवर तसेच नाभीला तूप लावू शकता. असे केल्याने ओठांची आर्द्रता टिकून राहते. तूप त्वचेला आर्द्रता देते तसेच ती निरोगी आणि चमकदार बनवते

नाभीत तूप लावल्याने केस गळणे कमी होते.

पावसाळ्यात बहुतेक लोकांचे केस खूप तुटायला लागतात. ही समस्या तुम्हालाही सतावत असेल तर रात्री नाभीत तूप लावून झोपा.

नाभीत तूप लावल्याने प्रजनन क्षमता वाढवते आणि मासिक पाळीच्या क्रॅम्पपासून आराम देते

नाभीत तूप लावल्याने पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या आणि गतिशीलता सुधारण्यास मदत होते. तसेच स्त्रियांमध्ये प्रजनन क्षमता वाढवते. मासिक पाळीच्या दरम्यान पेटके आणि वेदना कमी करते.

मराठीतील 'भारी' बातम्यांसाठी