मायग्रेनमुळे मळमळ, उलट्या आणि प्रकाश आणि आवाजाची संवेदनशीलता वाढते. त्याच्या हल्ल्याचा कालावधी काही तासांपासून अनेक दिवसांपर्यंत असू शकतो. मायग्रेनचे नेमके कारण माहित नसले तरी ही स्थिती अनुवांशिक मानली जाते.
खराब जीवनशैली, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, मोबाईल-लॅपटॉपचा अतीवापर यामुळे मायग्रेन उद्भवू शकते. अनेक वेळेस लोकं मायग्रेनच्या दुखण्यापासून आराम मिळवण्यासाठी पेनकिलरचा अवलंब करतात. जर तुम्हीही मायग्रेनच्या समस्येने त्रस्त असाल तर काही घरगुती उपायांच्या मदतीने तुम्ही हा त्रास दूर करू शकता.
मायग्रेनचा त्रास कमी करण्यासाठी तुम्ही लिंबाच्या सालीचाही वापर करू शकता. यासाठी लिंबाची साले चोळून बारीक करा. ही पेस्ट कपाळावर लावा. लिंबाचा सुगंध इंद्रियांना शांत करण्यास मदत करतो.