पार्टनरच्या घोरण्याचा तुम्हाला त्रास होतोय? 'हे' 5 उपाय करून पाहाच!

बरेच लोक झोपताना जोरात घोरतात. त्यामुळे त्यांच्या जोडीदाराची किंवा त्यांच्यासोबत झोपलेल्या लोकांची झोपमोड होते. वास्तविक, झोपताना श्‍वसनसंस्थेत अडथळा निर्माण झाल्यास माणूस घोरतो.

घोरण्याच्या समस्येमागे अनेक कारणे असू शकतात. झोपेत असताना श्वसनसंस्थेत अडथळा निर्माण झाल्यास शरीरातील अंतर्गत पेशींच्या कंपनामुळे हा नकोसा आवाज निर्माण होतो. काही लोक थकवा किंवा तणावामुळे घोरतात.

त्यामुळे घोरण्याच्या समस्येकडे दुर्लक्ष करता कामा नये. घोरण्याच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी काही उपाय आहेत, ते जाणून घ्या.

ऑलिव तेल

घोरण्यापासून मुक्त होण्यासाठी तुम्ही ऑलिव्ह ऑईल वापरू शकता. यात दाहक-विरोधी गुणधर्म आहेत, ज्यामुळे सूज दूर होण्यास मदत होते. त्यामुळे श्वास घेणे सोपे होते. यासाठी रात्री झोपण्यापूर्वी ऑलिव्ह ऑईलचे काही थेंब नाकात टाका.

हळद

घोरण्याच्या उपचारात हळद खूप प्रभावी ठरू शकते. यात दाहक-विरोधी गुणधर्म आहेत, जे नाकातील रक्तसंचय आणि सूज दूर करण्यास मदत करतात. यासाठी रोज रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास कोमट दुधात चिमूटभर हळद मिसळून प्या. याच्या नियमित सेवनाने घोरणे दूर होते आणि झोपही चांगली लागते.

मध

घोरण्याच्या समस्येपासून मुक्ती मिळवण्यासाठी मध गुणकारी आहे. यात दाहक-विरोधी आणि सूक्ष्मजीवविरोधी गुणधर्म आहेत, ज्यामुळे श्वासोच्छवासाच्या समस्या दूर होतात. यासाठी एका ग्लास कोमट पाण्यात एक चमचा मध मिसळा आणि रात्री झोपण्यापूर्वी प्या.

तूप

तूप वापरून घोरण्याची समस्या दूर होऊ शकते. यासाठी तूप हलके गरम करावे. यानंतर त्याचे काही थेंब नाकात टाका. याच्या नियमित वापराने तुम्हाला घोरण्यापासून आराम मिळेल.

लसूण

सायनसमुळे देखील घोरण्याची समस्या उध्दभवू शकते. अशा परिस्थितीत लसणाचे सेवन करणे खूप फायदेशीर ठरू शकते. यासाठी रात्री झोपण्यापूर्वी लसणाच्या पाकळ्या तळून कोमट पाण्याने चघळा. याचे नियमित सेवन केल्याने तुम्ही घोरण्यापासून लवकर आराम मिळवू शकता.

सकाळी रिकाम्या पोटी भिजवलेली मूग डाळ खाल्ल्याने होतात जबरदस्त फायदे!