थंड पाण्याने अंघोळ करण्याचे ‘हे’ आश्चर्यकारक फायदे, वाचा सविस्तर!
थंड पाण्याने अंघोळ केल्याने सर्व आळस दूर होतो आणि आपल्याला ताजेतवाने वाटते. जेव्हा थंड पाण्याचा शरीराला स्पर्श होतो तेव्हा श्वासोच्छ्वास वेगवान होतो आणि हृदयाचे ठोके थोडेसे वाढतात, त्यामुळे शरीरातील रक्त प्रवाह वाढतो आणि आपल्याला ताजेतवाने वाटते.
थंड पाण्याने आंघोळ केल्याने तणाव, डोकेदुखी आणि थकवा यापासून आराम मिळतो. एका अभ्यासानुसार, थंड शॉवर घेतल्याने आपली प्रतिकारशक्ती मजबूत होते. थंड शॉवर घेतल्याने हानिकारक रसायने आणि हार्मोन्स शरीरातून काढून टाकले जातात.
थंड शॉवर घेतल्याने केस आणि त्वचा चमकदार होते, असे त्वचा तज्ज्ञ सांगतात. मुरुमांचा त्रास असलेल्या व्यक्तीने थंड पाण्याने आंघोळ करावी, कारण यामुळे त्वचा कोरडी आणि निर्जीव होण्यापासून बचाव होईल.
थंड शॉवर घेतल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असेल तर शरीरात पांढऱ्या रक्त पेशी वाढतात. पांढऱ्या रक्त पेशी अनेक रोगांशी लढण्यास मदत करतात. थंड शॉवर घेतल्याने रोगप्रतिकारक शक्ती आणि लिम्फ उत्तेजित होते, ज्यामुळे संक्रमणाशी लढा देणाऱ्या पेशींचे उत्पादन वाढते.
एका संशोधनानुसार, सकाळी एक कप कॉफी पिण्यापेक्षा थंड शॉवर घेतल्याने जास्त ऊर्जा मिळते.
वैज्ञानिक अभ्यासानुसार, थंड शॉवर घेतल्याने पुरुषांमध्ये प्रजनन क्षमता वाढते. कारण गरम पाण्यात अंघोळ केल्याने शुक्राणूंची संख्या कमी होते, ज्याचा अंडकोषांवर वाईट परिणाम होतो. जर तुम्ही नवीन बाळाला घरी आणण्याच्या तयारीत असाल तर फक्त थंड पाण्याने आंघोळ करा.
जर तुम्हाला झोप येत नसेल तर थंड पाण्याने आंघोळ करा. थंड पाणी तुमची श्वसन प्रणाली सुधारते, ज्यामुळे सर्व थकवा दूर होतो आणि निद्रानाशाची समस्या दूर होते.
डोळ्यांबद्दलच्या ‘या’ गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का?