शरीरात पाणी कमी झालंय हे कसं कळेल? 'ही' आहेत लक्षणे! जाणून घ्या....

पाणी शरीरासाठी खूप महत्वाचे आहे. पाणी कमी प्यायल्यास अनेक आजार होण्याची भीती असते. कारण पाणी शरीरातील विषारी पदार्थ सहजपणे बाहेर काढण्यास मदत करते. याशिवाय शरीराचे सर्व अवयवही सुरळीतपणे काम करू शकतात. 

पाण्याच्या कमतरतेमुळे हृदयाच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. त्याचबरोबर युरिन इन्फेक्शन, बद्धकोष्ठता आणि अपचनाच्या समस्या वाढतात. त्याचबरोबर पाण्याअभावी चेहऱ्यावर मुरुमेही दिसतात. 

अनेक वेळा शरीरात पाण्याची कमतरता असते पण आपल्याला ते समजत नाही . अशा स्थितीत शरीरात पुढील लक्षणे दिसली तर समजून घ्या की तुम्ही डिहायड्रेशनचे शिकार आहात.

पिवळी लघवी

जर तुम्हाला मुक्तपणे लघवी करता येत नसेल आणि लघवीचा रंग पिवळसर असेल तर तुमच्या शरीरात पाण्याची कमतरता आहे. 

श्वासाची दुर्घंधी

पाण्याच्या कमतरतेमुळे तोंडात कमी लाळ तयार होते आणि तोंडाला दुर्गंधी येते. दात आणि तोंड स्वच्छ करूनही तोंडाला दुर्गंधी येत असेल तर जास्त पाणी पिण्यास सुरुवात करा

कोरडी त्वचा आणि ओठ

जर त्वचा नेहमी कोरडी होत असेल  आणि ओठांभोवतीचा भाग कोरडा वाटत असेल तर शरीरात पाण्याची कमतरता जाणवते. 

अशक्तपणा आणि सुस्ती

डिहायड्रेशनमुळे रक्तदाब कमी होतो. त्यामुळे थकवा, सुस्त आणि चक्कर आल्यासारखे वाटते. त्यामुळे सुस्ती आणि चक्कर आल्यावर पाणी पिणे फार महत्वाचे आहे.

जास्त झोप आणि थकवा

जर तुम्हाला खूप थकवा आणि झोप येत असेल तर हे शरीरात पाण्याची कमतरता असल्याचे लक्षण आहे. डिहायड्रेशनवर मात करण्यासाठी, भरपूर द्रव आणि पाणी प्या.

मसल्स क्रॅम्प

पाण्याच्या कमतरतेमुळे आणि डिहायड्रेशनमुळे इलेक्ट्रोलाइटचे संतुलन बिघडते आणि स्नायूंमध्ये क्रॅम्प्स येतात. ही परिस्थिती देखील निर्जलीकरणाचे लक्षण आहे.

मराठीतील 'भारी' बातम्यांसाठी