Kidney Stone : किडनीस्टोनचा त्रास असेल, तर बंद करा 'हे' खाणं!

किडनी स्टोनची समस्या अनेकदा उशिरा लक्षात येते. अशा परिस्थितीत डॉक्टर औषध किंवा ऑपरेशनचा सल्ला देतात. 

पण त्याचवेळी किडनी स्टोनच्या बाबतीत आहाराकडे लक्ष देणे गरजेचे आहे. कारण अशा अनेक भाज्या आणि फळे आहेत जी दगडांची समस्या वाढवू शकतात. ज्यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. 

जर तुम्हाला किडनी स्टोनची समस्या असेल तर या पदार्थांपासून पूर्ण अंतर ठेवा. जाणून घ्या कोणते आहेत ते पदार्थ.

मांसाहारामध्ये प्रथिनांचे प्रमाण जास्त असते आणि जेव्हा जास्त प्रथिने असतात तेव्हा ते जास्त कॅल्शियम लघवीद्वारे बाहेर टाकते. अशा स्थितीत कॅल्शियमच्या कमतरतेमुळे किडनी स्टोन लवकर तयार होतात आणि वाढतात. त्यामुळे डॉक्टर मांस न खाण्याचा सल्ला देतात.

भाज्या आणि फळे ज्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि ऑक्सलेटचे प्रमाण जास्त असते. त्यांना आहारापासून दूर ठेवले पाहिजे. जसे कि टोमॅटो, टोमॅटो बिया,वांग्याच्या बिया,सोयाबीन,पालक,चिकू,भोपळा.

तुम्हाला मुतखडा असेल किंवा मुतखडा होण्याचा धोका असेल तर तुम्ही दूध आणि दुग्धजन्य पदार्थांपासून दूर राहावे.

किडनी स्टोनची समस्या असल्यास मीठ कमीत कमी खावे. जास्त प्रमाणात सोडियम किडनीमध्येच दगड तयार होण्यास मदत करते.

थंड पेय आरोग्यासाठी हानिकारक आहे. शरीरात किडनी स्टोन होण्याचा धोका असेल तर कोल्ड्रिंक्स अजिबात पिऊ नये. कोल्ड्रिंक्समध्ये फॉस्फोरिक अॅसिड आढळते ज्यामुळे स्टोनचा धोका वाढतो.

किडनी स्टोनच्या बाबतीत, अधिक पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो परंतु लोक चहा आणि कॉफी सारख्या गोष्टी द्रवपदार्थ असलेले कॅफिन पिण्यास सुरुवात करतात. त्यामुळे शरीरातील डिहायड्रेशनचा धोका वाढतो.

मराठीतील 'भारी' बातम्यांसाठी