सरळ, उलटं किंवा वाकडं...तुमच्या झोपण्यावरून तुमचं व्यक्तिमत्व ओळखा!

असा एक सामान्य समज आहे की तुम्ही रात्री एकदा झोपलात की तुम्ही कसे  झोपला आहात हे आठवत नाही. हे काही प्रमाणात खरे आहे.  (Your sleeping position reveals your personality traits)

अनेकांना वेगवेगळ्या प्रकारे झोपायला आवडते. काही लोकांना पोटावर झोपायला आवडते तर काही लोकांना पाय दुमडून झोपायला आवडते. पण तुम्हाला माहीत आहे का की तुमच्या झोपण्याच्या पद्धतीवरून तुमच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये ठरवता येतात.  (Your body language in bed)

होय, तुम्ही ते अगदी बरोबर वाचले आहे. तुम्ही ज्या पद्धतीने झोपता त्यावरून तुम्ही तुमच्या किंवा कोणत्याही व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाचा अंदाज लावू शकता.

एका कूशीवर झोपणे (sleep on your sides)

जर तुम्हाला एका कूशीवर झोपायला आवडत असेल तर समजून घ्या की तुम्ही अशा लोकांपैकी एक आहात जे इतरांवर खूप लवकर विश्वास ठेवतात. खरं तर, या स्थितीत झोपलेले लोक स्वभावाने अतिशय नम्र असतात .

पाठीवर झोपणे(sleep on your back)

जर तुम्हाला सरळ झोपायला आवडत असेल, म्हणजे तुमच्या पाठीवर, तर तुमचा स्वभाव गंभीर आहे. गंभीर स्वभावाचे लोक सहसा त्यांच्या संभाषणात गंभीर असतात. त्यांना अनावश्यक गोष्टी करायला आवडत नाहीत किंवा त्यांना कोणत्याही गोष्टीसाठी शॉर्टकट घ्यायला आवडत नाही.

हात पाय पसरून झोपणे(sleeps in a starfish position)

तुमच्या लक्षात आले असेल की अनेकांना बेडवर हात आणि पाय पसरून झोपायला आवडते, ज्याला स्टारफिश पोझिशन असेही म्हणतात. जर तुम्हालाही अशा प्रकारे झोपायला आवडत असेल, तर तुमच्यात हा गुण आहे की तुम्ही इतरांच्या मदतीपासून दूर जात नाही. अशा प्रकारे, झोपलेली व्यक्ती संकटाच्या वेळी न डगमगता मदत करण्यास तयार होते.

पोटावर झोपणे(sleep on your stomach)

अनेकदा असे दिसून आले आहे की काही लोक हट्टी स्वभावाचे असतात आणि हे लोक त्यांच्या झोपण्याच्या पद्धतीवरून ओळखले जाऊ शकतात. या स्थितीत झोपलेले लोक अनेकदा गर्विष्ठ असतात आणि त्यांना स्वतःच्या जगात राहायला आवडते. या लोकांना त्यांची टीका ऐकून अनेकदा राग येतो आणि ते खूप भटके आणि हौशी लोक असतात.

पाय छातीला चिकटवून झोपणे(sleep in fetal position)

अनेकांना त्यांचे पाय छातीला चिकटवून झोपायला आवडते. अशा प्रकारे झोपणारे लोक स्वभावाने अतिशय सौम्य असतात आणि मैत्री जपण्यात पटाईत असतात.

मराठीतील 'भारी' बातम्यांसाठी