जगातील 10 सर्वात श्रीमंत महिला

जगातील 10 सर्वात श्रीमंत महिला कोण आहेत, हे फार कमी लोकांना माहीत असेल. परंतु काही महिला ज्या संस्थांशी निगडीत आहेत त्याबद्दल अनेकांना नक्कीच माहिती असेल. चला पाहूया जगातील 10 सर्वात श्रीमंत महिला कोण आहेत.

फ्रँकोइस बेटेनकोर्ट मेयर्स (Francoise Bettencourt Meyers)

फ्रँकोइस बेटेनकोर्ट मेयर्स ह्या  ब्युटी प्रॉडक्ट्स मॅन्युफॅक्चरिंग कंपनी लॉरियलच्या शेअरहोल्डर आहेत. कंपनीची स्थापना त्यांचे आजोबा यूजीन शुलर यांनी केली होती. त्यांच्या कुटुंबाची कंपनीत 33 टक्के हिस्सेदारी आहे. फोर्ब्सच्या मते, त्यांची एकूण संपत्ती सुमारे 9790 कोटी अमेरिकन डॉलर्स आहे. 

अॅलिस वॉल्टन (Alice Walton)

अॅलिस वॉल्टन ह्या जगातील दुसरी सर्वात श्रीमंत महिला आहेत. त्यांची एकूण संपत्ती 6060 कोटी अमेरिकन डॉलर्स आहे. वॉलमार्टचे संस्थापक सॅम वॉल्टन यांची ती एकुलती एक मुलगी आहे. 

ज्युलिया कोच (Julia Koch)

ज्युलिया कोच यांची एकूण संपत्ती 5870 कोटी अमेरिकन डॉलर्स आहे. 2019 मध्ये, त्यांचे पती डेव्हिड कोच मरण पावले आणि कोच इंडस्ट्रीजचे 42 टक्के शेअर्स त्यांच्याकडे आले. 

जॅकलिन मार्स (Jacqueline Mars)

फूड अँड  पेट केयर फर्म मार्समध्ये जॅकलिन मार्स यांची  एक तृतीयांश भागीदारी आहे. त्यांची एकूण संपत्ती 3800 कोटी अमेरिकन डॉलर्स आहे.

मिरियम एडेलसन (Miriam Adelson)

मिरियम एडेलसन यांची एकूण संपत्ती 3230 कोटी अमेरिकन डॉलर्स आहे. कॅसिनो जगतातील प्रसिद्ध व्यक्तिमत्व शेल्डन एडेलसन यांची पत्नी आहे. लास वेगास सँड्समध्ये तिच्या मालकीची 50 टक्के हिस्सेदारी आहे, जी पतीच्या मृत्यूनंतर वारशाने त्यांना मिळाली.

मॅकेन्झी स्कॉट (Mackenzie Scott)

जेफ बेझोस यांची माजी पत्नी मॅकेन्झी स्कॉट यांची संपत्ती 4130 कोटी अमेरिकन डॉलर्स आहे. त्या एक पुरस्कार विजेत्या लेखिका देखील आहे. अॅमेझॉनमध्ये त्यांची 4 टक्के भागीदारी आहे.

सावित्री जिंदाल (Savitri Jindal)

सावित्री जिंदाल यांची संपत्ती 2750 कोटी अमेरिकन डॉलर्स च्या वर गेली आहे. भारतात या वर्षात कोणाच्या संपत्तीत सर्वाधिक वाढ झाली असेल, तर त्या आहेत सावित्री जिंदाल. एका वर्षात त्यांची एकूण संपत्ती $9.6 अब्जने वाढली आहे. त्या ओपी जिंदाल ग्रुपच्या अध्यक्षा आहेत.

जीना राइनहार्ट (Gina Rinehart)

जीना राइनहार्ट ऑस्ट्रेलियाच्या Hancock Prospecting Group च्या कार्यकारी अध्यक्षा आहेत. त्यांची एकूण संपत्ती 2730 कोटी अमेरिकन डॉलर्स आहे.

सुझॅन क्लॅटन (Susanne Klatten)

सुझॅन क्लॅटन अटलांटा या फार्मास्युटिकल कंपनीची मालक आणि उपाध्यक्ष आहेत. त्यांची एकूण संपत्ती 2440 कोटी अमेरिकन डॉलर्स आहे. बीएमडब्ल्यूमध्येही त्यांची 19 टक्के भागीदारी आहे. 

आयरिस फॉन्टबोना (Iris Fontbona) 

तांबे खाण कंपनी अँटोफागास्ता पीएलसीच्या त्या कंट्रोलर आहे. याशिवाय, त्या लंडन स्टॉक एक्सचेंजवर त्या ट्रेडिंग करतात. त्यांची एकूण संपत्ती 2450 कोटी अमेरिकन डॉलर्स आहे.

ब्लड प्रेशर वाढलंय! शरीरात दिसू लागतात ‘ही’ 5 लक्षणे, दुर्लक्ष करू नका!