

Bajrangi Bhaijaan 10 Years Anniversary : १७ जुलै २०१५ या दिवशी रिलीज झालेला सलमान खानचा सिनेमा ‘बजरंगी भाईजान’ आज १० वर्षांचा झाला. बॉक्स ऑफिसवर धूम उडवत या चित्रपटाने फक्त कमाईच केली नाही, तर प्रेक्षकांच्या मनालाही गहिवरून टाकलं.
चित्रपटात सलमान खानने साकारलेला पवन चतुर्वेदी, आणि त्याची मूकबधिर पाकिस्तानी चिमुरडी ‘मुन्नी’ला तिच्या घरी पोहोचवण्याची भावनिक यात्रा, प्रेक्षकांना गहिवरून गेली होती.
‘बजरंगी भाईजान’ची गोष्ट..
या सिनेमात सलमानने साकारलेला पवन एक साधा, श्रद्धाळू हनुमान भक्त असतो, ज्याला भारतात हरवलेली एक पाकिस्तानी मुलगी सापडते. ती बोलू शकत नाही, पण तिच्या डोळ्यांतून बोलणं ऐकू येतं.
पवन तिच्या आई-वडिलांचा शोध घेत पाकिस्तानपर्यंत जातो. ही गोष्ट देशाच्या सीमा ओलांडून माणुसकीचा सेतू घालते, आणि याचंच प्रेक्षकांनी भरभरून स्वागत केलं.
हेही वाचा – सातोशी नाकामोतो : ब्रिटनमध्ये राहणारा की जपानमधला? अख्खं जग शोधतंय याचं उत्तर
बजरंगी भाईजानची बॉक्स ऑफिस कामगिरी
- बजेट – ₹९० कोटी
- पहिल्या दिवशीची कमाई – ₹२७.२५ कोटी
- पहिल्या विकेंडमध्येच १०० कोटी पार
- जगभरातील एकूण कमाई – ₹९२२ कोटी (IMDB डेटा)
हा सिनेमा २०१५ मधील सर्वात जास्त कमाई करणारा भारतीय चित्रपट ठरला होता.
‘बजरंगी भाईजान’चे काही रोचक आणि अज्ञात किस्से
या सिनेमाची मूळ कथा लेखक विजेंद्र प्रसाद यांनी राकेश रोशन यांना आधी सांगितली होती, पण ती बनली नाही. हीच भूमिका आधी आमिर खानला देण्यात आली होती, पण स्क्रिप्टमध्ये बदल न झाल्याने त्याने नकार दिला. हर्षाली मल्होत्रा (मुन्नी) हिने ५००० मुलांमधून निवड होऊन डेब्यू केला होता.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!