दिल्लीतून पळून सलमान खानला भेटायला निघाली 3 पोरं, चिठ्ठी लिहून घर सोडलं, मग…

WhatsApp Group

Delhi Minor Ran Away To Meet Salman Khan : सलमान खानचे चाहते फक्त मोठेच नाही, तर लहान मुलंही त्याच्या स्टारडमसाठी वेडी आहेत. असंच काहीसं घडलं दिल्लीतील तीन चिमुकल्यांसोबत, ज्यांनी फक्त ऑनलाइन गेमवर झालेल्या ‘वाद्याच्या’ जोरावर घर सोडलं आणि सलमान खानला भेटायला मुंबईच्या दिशेने निघाले!

जालना जिल्ह्यातील एका मुलाशी …

लल्लनटॉपने दिलेल्या वृत्तानुसार, या तीन मुलांची वय ९ ते ११ वर्षांदरम्यान आहे. दिल्लीमध्ये राहणारे हे तिघं एक ऑनलाइन गेम खेळत होते. या गेमदरम्यान त्यांची ओळख महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यातील एका मुलाशी झाली. त्या मुलाने दावा केला की तो सलमान खानला वैयक्तिकरित्या ओळखतो आणि भेटही घडवून देईल. ही गोष्ट इतकी खऱ्यासारखी वाटली की त्या तीन मुलांनी २५ जुलै रोजी आपापल्या बॅगा भरून घरातून पळ काढला.

चिठ्ठीत काय लिहिलं?

त्यांनी आपल्या पालकांसाठी एक चिठ्ठी सोडली, ज्यात लिहिलं होतं, “आम्ही आमच्या मित्राला भेटायला जालन्याकडे जात आहोत.” ही चिठ्ठी वाचून घाबरलेल्या पालकांनी पोलिसांत धाव घेतली. दिल्ली पोलिसांनी लगेचच BNS कलम १३७(२) अंतर्गत केस दाखल करून शोध सुरू केला.

हेही वाचा – August 2025 Rule Changes : आजपासून झाले 6 मोठे बदल, बँकिंग आणि खरेदीवर होणार थेट परिणाम!

मुंबई जाणाऱ्या ट्रेनचा माग घेतला

पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि टेक्निकल डेटा वापरून त्यांच्या हालचाली ट्रॅक केल्या. सुरुवातीला ते अजमेरी गेटकडे गेले होते आणि नंतर सचखंड एक्सप्रेस ट्रेनमधून प्रवास केला असावा, असा अंदाज लावण्यात आला. जालन्यात पोलिसांनी त्या गेमिंग मित्राच्या घरी शोध घेतला, पण तिथे मुले सापडली नाहीत. तांत्रिक निरीक्षणात त्या मुलाचा मोबाईल काही वेळच ऑन होत होता आणि पुन्हा बंद होत होता, यावरून अंदाज घेत नाशिक रेल्वे स्थानकावर पोलीस पोहोचले आणि तिथे शेवटी ती तीन मुलं सापडली.

‘Free Fire’ गेममधून बनली ओळख

चौकशीत तिन्ही मुलांनी सांगितले की, ते गेल्या दीड वर्षांपासून ‘Free Fire’ गेम खेळत होते. त्यातूनच त्यांची ओळख जालन्याच्या मुलाशी झाली. एके दिवशी त्याने विनोद करत सांगितलं की तो सलमान खानला भेटला आहे, आणि ही गोष्ट खरं समजून मुलांनी थेट भेटीची योजना आखली.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment