सगळे म्हणत होते ‘गजनी’ पहिला 100 कोटींचा सिनेमा… पण खरी गोष्ट वेगळीच आहे!

WhatsApp Group

First 100 crore Bollywood movie : बॉलीवूडमध्ये सध्या 100 कोटींचा आकडा पार करणं म्हणजे काही मोठी गोष्ट राहिलेली नाही. सलग अनेक चित्रपट हे टप्पे सहज पार करताना दिसत आहेत. मात्र तुम्हाला माहिती आहे का, हिंदी चित्रपटसृष्टीचा पहिला 100 कोटी क्लबमध्ये पोहोचलेला सिनेमा कोणता होता? जर माहीत नसेल, तर ही खास रिपोर्ट नक्की वाचा.

80 च्या दशकात आली होती पहिली 100 कोटींची हिंदी फिल्म

जेव्हा बॉलीवूडच्या पहिल्या 100 कोटींच्या चित्रपटाची चर्चा होते, तेव्हा अनेकदा आमिर खानच्या ‘गजनी’ किंवा ‘3 इडियट्स’चं नाव पुढं येतं. पण सत्य हे आहे की, त्या आधीच एक चित्रपट असा होता ज्याने जागतिक पातळीवर 100 कोटींची कमाई केली होती. हा चित्रपट होता – ‘डिस्को डान्सर’, जो 1982 मध्ये प्रदर्शित झाला होता.

सामान्य दिसणारा अभिनेता बनला सुपरस्टार

या चित्रपटात मिथुन चक्रवर्ती यांनी मुख्य भूमिका साकारली होती. एक सामान्य रस्त्यावर गाणं गाणारा मुलगा – ज्याचा प्रवास डिस्को स्टारपर्यंत पोहोचतो – ही कथा प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली.

 ‘डिस्को डान्सर’ने किती केली होती कमाई?

‘डिस्को डान्सर’ने भारतात जवळपास 6 कोटी रुपयांची कमाई केली होती. मात्र या चित्रपटाची खरी कमाई झाली होती आंतरराष्ट्रीय पातळीवर. माहितीनुसार, या सिनेमाने जागतिक स्तरावर एकूण 100.68 कोटी रुपयांची कमाई केली होती. या यशामुळे हा सिनेमा हिंदी चित्रपटसृष्टीतील पहिला 100 कोटी क्लबमध्ये पोहोचणारा चित्रपट ठरला.

‘शोले’ला दिलं मागं टाकून रचला विक्रम

‘डिस्को डान्सर’च्या आधीपर्यंत ‘शोले’ हा सर्वाधिक कमाई करणारा हिंदी सिनेमा होता. मात्र मिथुनच्या या सुपरहिट चित्रपटाने शोलेचाही रेकॉर्ड मोडत एक नवा इतिहास घडवला.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment