स्मृती इराणींकडून खुलासा! सांगितलं अभिनयात परतण्यामागचं कारण, म्हणाल्या, ‘‘मी आजवर कधीच…’’

WhatsApp Group

Smriti Irani Acting Comeback : कधी संपूर्ण घराघरात ‘तुलसी’ म्हणून ओळखल्या गेलेल्या स्मृती इराणी आता पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पदार्पण करत आहेत. ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ या गाजलेल्या मालिकेचा दुसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, आणि विशेष म्हणजे स्मृती यावेळी पुन्हा आपल्या प्रसिद्ध भूमिकेत दिसणार आहेत.

स्मृती इराणी यांनी एका मुलाखतीत सांगितलं की, “मी आजवर कधीच ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी काम केलं नव्हतं. पण जेव्हा उदय शंकर (JioCinema चे व्हाइस चेअरमन) आणि एकता कपूर यांच्या टीमसोबत काम करण्याची संधी मिळाली, तेव्हा मी ती सोडू शकले नाही. ही एक लिमिटेड सिरीज असेल, आणि मला आजच्या काळातले विषय एकता कशी सादर करते, हे पाहायचं होतं.”

सेटवरील अनुभवही शेअर

स्मृती म्हणाल्या, “आजच्या काळात सेटवर काम करण्याची पद्धत पूर्णपणे बदलली आहे. मला नव्या कलाकारांसोबत वाचन (रीडिंग) करायला सांगितलं गेलं, जेणेकरून त्यांना माझ्यासोबत कम्फर्टेबल वाटेल. मी दीड तास त्यांच्यासोबत बसले. पूर्वी एवढी तयारी नसायची, आता मात्र खूप रिहर्सल होते.”

राजकारण आणि अभिनय दोन्ही सांभाळणार!

पूर्व केंद्रीय मंत्री असलेल्या स्मृती इराणी यांनी यावेळी स्पष्ट केलं की, आधी अभिनय आणि राजकारण या दोन वेगवेगळ्या गोष्टी वाटायच्या. पण आता त्या दोन्ही क्षेत्रांत सक्रिय राहण्याचा निर्णय घेतला आहे.

‘सास बहू’ सीझन 2 लवकरच ओटीटीवर!

एकता कपूर यांच्या बॅनरखाली आणि जिओ सिनेमा या प्लॅटफॉर्मवरून ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नव्या पिढीच्या समस्या, बदलती कुटुंबव्यवस्था आणि जुन्या ‘तुलसी’चा नवा अवतार — हे सगळं पाहणं नक्कीच रोचक ठरेल!

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment