

Baparde Tennis Cricket Tournament : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातल्या बापर्डे गावात लवकरच एक ऐतिहासिक क्रिकेट स्पर्धा रंगणार आहे. ही स्पर्धा सामान्य क्रिकेट स्पर्धा नसून एक सामाजिक हेतूने प्रेरित उपक्रम आहे, ज्याचा उद्देश गावातील एका शाळेला आर्थिक हातभार लावणं हा आहे.
डिसेंबर – जानेवारी महिन्यात होणारी ही डे-नाईट जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धा महाराष्ट्रातील पहिलीच अशी स्पर्धा ठरणार आहे, जिथे स्पर्धेतून मिळणारा संपूर्ण निधी – बक्षीस रक्कम वगळता – गावातील शाळेला दिला जाणार आहे!
कोणत्या शाळेसाठी होतोय हा उपक्रम?
ही क्रिकेट स्पर्धा श्री देवी पावणादेवी कृपा शिक्षण विकास मंडळ संचलित यशवंतराव राणे माध्यमिक विद्यालय, बापर्डे-जुवेश्वर या शाळेसाठी आयोजित केली जात आहे. ही शाळा सध्या कोणतीही सरकारी अनुदान/ग्रँट न घेता गावकऱ्यांच्या आणि समाजातील दात्यांच्या मदतीने चालवली जाते.
सुधा मूर्तींचा विशेष आशीर्वाद
या शाळेचं महत्व एवढं आहे की प्रसिद्ध लेखिका आणि समाजसेविका पद्मश्री डॉ. सुधा मूर्ती यांनीही स्वतः या शाळेला भेट दिली होती. त्यांनी ‘कोण होणार करोडपती’ या मराठी कार्यक्रमात जिंकलेली संपूर्ण ₹25 लाखांची रक्कम याच शाळेला दान केली होती. त्यामुळेच या शाळेच्या विकासासाठी गावकऱ्यांपासून शहरातील तरुणांपर्यंत सर्वांनी एकत्र येत हा क्रांतिकारी उपक्रम हाती घेतला आहे.
क्रिकेट आणि शिक्षणाचं अनोखं समीकरण
या स्पर्धेच्या आयोजकांनी स्पष्ट केलं आहे की स्पर्धेतून मिळणाऱ्या कोणत्याही स्वरूपाच्या उत्पन्नाचा एकही पैसा वैयक्तिक फायद्यासाठी वापरला जाणार नाही. बक्षीस रक्कम वगळता उरलेला संपूर्ण निधी शाळेच्या पायाभूत सुविधांसाठी, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजांसाठी व विकासासाठी वापरला जाणार आहे.
हेही वाचा – फॅन्स म्हणाले, “कोहली-कोहली”, पण हारिस राऊफने काय केलं? पाहा व्हायरल VIDEO!
या स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील प्रमुख संघ, खेळाडू, क्रिकेटप्रेमी आणि सामाजिक कार्यकर्ते सहभागी होणार असून, स्पर्धेचे नियोजन अगदी व्यवस्थित व पारदर्शक पद्धतीने करण्यात येत आहे.
एक सामाजिक क्रांती घडवणारा उपक्रम!
बापर्डे गावाची ही स्पर्धा केवळ क्रिकेटप्रेमींसाठीच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक प्रेरणास्थान ठरू शकते. शिक्षणासाठी अशा प्रकारे निधी उभारणं हा प्रकार दुर्मीळच. ही स्पर्धा दाखवते की खेळ आणि समाजकार्य एकत्र आल्यास किती मोठा बदल घडवता येतो.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा