“न संपत्ती, न लॉटरी – केवळ मेहनत, संयम आणि साधेपणातून १० वर्षांत ४ कोटींची कमाई!”

WhatsApp Group

Small VillageTechie Saves 4 Crores : एका गावात राहूनही माणसाला करोडपती होता येते, याचं ताजं उदाहरण जगासमोर आलं आहे. एका छोट्याशा गावातून आलेल्या तरुणाने सोशल मीडियावर आपल्या आयुष्याची अशी प्रेरणादायी कहाणी शेअर केली आहे, जी सध्या लाखो लोकांच्या मनाला भिडत आहे. अवघ्या ३४ व्या वर्षी, एका टेक्नोलॉजी एक्सपर्ट तरुणाने १० वर्षांत ४ कोटी रुपये जमवले आहेत – ना कोणतीही लॉटरी, ना विरासत, फक्त शिस्त, मेहनत आणि संयमी जीवनशैली!

एका सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या युवकाने आपला प्रवास मांडला. तो लिहितो, “ना कोणतीही लॉटरी, ना संपत्ती, फक्त माझी १० वर्षांची मेहनत, संयम आणि शिस्तबद्ध बचतीची सवय यामुळे मी हे साध्य केलं आहे.”

गावातून उगमलेली आशेची ज्योत

या युवकाचं बालपण अत्यंत गरिबीत गेलं. त्याचे वडील एक दिहाडीवर काम करणारे मजूर होते. शालेय शिक्षणही सरकारी हिंदी माध्यमातून पूर्ण झालं. त्याने सांगितलं, “बाबा नेहमी म्हणायचे, ‘ज्या दिवशी लोक मला तुझ्या नावाने ओळखतील, त्या दिवशी मला खऱ्या अर्थाने अभिमान वाटेल.’ हाच माझ्या जीवनाचा आधार बनला.”

कंप्युटरने दिली स्वप्नांना दिशा

गरीबीमुळे लहानपणी अनेक अभाव अनुभवले. पण पहिल्यांदा कंप्युटर पाहिल्यावर त्याचे जीवनच बदलले. त्याने तीच आपली जिद्द बनवली. कोचिंग किंवा मार्गदर्शक नसतानाही, ऑनलाइन फ्री रिसोर्सेस, पुस्तके, आणि स्वत:च्या चुका यातून तो शिकत गेला. तो लिहितो, “मला आजही आठवतं – भूक कशी असते! केवळ पोटदुखीची भूक नाही, तर ती भूक की जिथे तुम्हाला ब्रँडेड टीशर्ट घालून सामान्य वाटावं, शहरात हरवावं वाटावं…”

हेही वाचा – गॅस सिलिंडर लवकर संपतोय? आपल्याकडून होणाऱ्या चुका आणि बचतीचे खास उपाय, जाणून घ्या

मेहनतीतून संपत्तीची वाट

त्याला पूर्णवेळाची नोकरी मिळाली आणि त्यासोबतच पार्ट-टाईम व्यवसायही सुरू केला. महिन्यागणिक बचत करत राहिला, खर्चांवर नियंत्रण ठेवलं. गाड्यांची आवड होती, पण घर घेण्याची घाई केली नाही. तो लिहितो, “आज माझ्याकडे कार आणि बाईक आहे. पण अजून घर घेतलेलं नाही. कारण माझ्या वडिलांना अभिमान माझ्या मेहनतीचा वाटतो – केवळ मालमत्तेचा नाही.”

सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव

या पोस्टवर सोशल मीडियावर शेकडो लोकांनी कमेंट केल्या आहेत. “तुम्ही दाखवून दिलं की मेहनत हीच खरी संपत्ती आहे”, “कोविडमध्ये आम्ही आमची कार विकली, अजूनही नवीन घेऊ शकलो नाही. तुमची कहाणी नवी आशा देते”, अशा भावना लोकांनी व्यक्त केल्या आहेत.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment