

आग लागणे, रस्ता अपघात किंवा कोणीतरी अचानक आजारी पडणे या गोष्टी होत असतात. विविध आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना तत्काळ मदत देण्यासाठी सरकारने अनेक पावले उचलली आहेत. अनेक सरकारी विभाग हेल्पलाइन नंबरची (All India Emergency Toll Free Numbers) सुविधा देतात जेणेकरून नागरिकांना या क्रमांकांवर कॉल करून आपत्कालीन परिस्थितीत त्वरित मदत मिळू शकेल. कारण हे सर्व नंबर टोल फ्री आहेत आणि आपत्कालीन परिस्थितीत तुम्ही त्यांना कधीही कॉल करू शकता.
101
घर, कार्यालय किंवा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी आग लागल्यास, अग्निशमन दलाला कॉल करण्यासाठी तुम्ही टोल फ्री नंबर 101 डायल करू शकता. आग विझवण्याचे काम करणाऱ्या अग्निशमन विभागाचा हा क्रमांक आहे.
102
आपत्कालीन परिस्थितीत लोकांना तात्काळ वैद्यकीय सेवा मिळावी यासाठी सरकारने 102 हा टोल फ्री क्रमांक सुरू केला आहे.
108
हा नंबर डायल करून तुम्ही आपत्कालीन परिस्थितीत वैद्यकीय सुविधा देखील मिळवू शकता.
103 आणि 112
रस्त्यावरून प्रवास करताना कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत, तुम्ही टोल फ्री क्रमांक 103 वर कॉल करून वाहतूक पोलिसांची मदत घेऊ शकता. त्याचप्रमाणे तुम्ही काही अडचणीत आल्यास 112 क्रमांकावर फोन करून पोलिसांची मदत घेऊ शकता.
1072 आणि 1073
रेल्वे अपघातात मदत मिळवण्यासाठी सरकारने 1072 हा टोल फ्री क्रमांक जारी केला आहे. या क्रमांकावर रेल्वे अपघाताची माहिती देऊन कोणतीही व्यक्ती आवश्यक मदत मिळवू शकते. रस्ता अपघात झाल्यास मदतीसाठी 1073 या क्रमांकावर कॉल करता येईल.
1090/1091
महिलांच्या मदतीसाठी देशात महिला हेल्पलाइनही सुरू आहे. 1090/1091 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करून महिला कोणत्याही प्रकारच्या अत्याचाराची किंवा शोषणाची तक्रार करू शकतात.
1098
बाल शोषणाची तक्रार करण्यासाठी 1098 हा टोल फ्री क्रमांक आहे.
हेही वाचा – कर्ज काढून घर घेणे कितपत योग्य? एक नाही अनेक फायदे आहेत!
1930
आजकाल लोकांची ऑनलाइन फसवणूक होत आहे. सायबर फसवणूक झाल्यास, टोल फ्री क्रमांक 1930 वर कॉल करून मदत घेतली जाऊ शकते. हा नंबर डायल करून, कोणीही मार्गदर्शन मिळवू शकतो, सायबर गुन्ह्यांची तक्रार करू शकतो आणि प्रशिक्षित व्यावसायिकांची मदत घेऊ शकतो.
1906
तुमच्या घर, दुकान किंवा हॉटेलमधील सिलिंडरमधून एलपीजी लीक होत असेल, तर तुम्ही आता आपत्कालीन हेल्पलाइन क्रमांक 1906 वर तक्रार नोंदवू शकता. नवी दिल्ली येथील नियंत्रण कक्षात ही तक्रार नोंदवली जाईल. असे केल्याने तुमच्या तक्रारीचे लवकरात लवकर निराकरण होईल.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!