

Cashless Health Insurance India : आरोग्य विमाधारकांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. बजाज एलियन्झ जनरल इन्शुरन्स आणि केअर हेल्थ इन्शुरन्सच्या कॅशलेस सेवांवर लावण्यात आलेली बंदी आता हटवण्यात आली आहे. त्यामुळे आता उत्तर भारतातील अनेक रुग्णालयांमध्ये या कंपन्यांचे विमाधारक पुन्हा एकदा कॅशलेस उपचाराचा लाभ घेऊ शकतील.
एसोसिएशन ऑफ हेल्थकेअर प्रोव्हाइडर्स ऑफ इंडिया (AHPI) ने स्पष्ट केले की, हा वाद मिटला असून 1 सप्टेंबर 2025 पासून लागू होणार असलेला कॅशलेस क्लेम बंदीचा निर्णय आता रद्द करण्यात आला आहे.
बैठक झाली, निर्णय घेतले
28 ऑगस्ट रोजी AHPI ची कोअर कमिटी आणि बजाज एलियन्झच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत दोन्ही पक्षांनी जुन्या तक्रारींवर चर्चा करून तोडगा काढला. आता बजाज एलियन्झ 29 सप्टेंबर 2025 पर्यंत AHPI ला त्यांच्या पुढील निर्णयांची माहिती देणार आहे आणि रुग्णालयांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी आवश्यक पावले उचलणार आहे. त्यानंतर AHPI नेही आपल्या सदस्य रुग्णालयांना पुन्हा कॅशलेस सेवा सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत.
हेही वाचा – इटलीच्या पंतप्रधानांचे अश्लील फोटो व्हायरल! पॉ@र्न वेबसाईटवर भयंकर प्रकार, सरकारचा आक्रोश
केअर हेल्थवर बंदीच नव्हती!
AHPI ने हेही स्पष्ट केले की केअर हेल्थ इन्शुरन्सच्या कॅशलेस सेवांवर कोणतीही बंदी लावलेली नव्हती. केवळ काही स्पष्टीकरण विचारण्यात आले होते, जे त्यांनी वेळेत दिले. त्यामुळे त्यांचे ग्राहक सुरुवातीपासूनच कॅशलेस सेवा घेत होते आणि पुढेही घेऊ शकतील.
AHPI चे आरोप काय होते?
AHPI च्या म्हणण्यानुसार, बजाज एलियन्झ अनेक वर्षांपासून रुग्णालयांच्या शुल्कामध्ये वाढ करत नव्हता, त्यामुळे रुग्णालयांना तोटा सहन करावा लागत होता. तसेच, नवीन रुग्णालयांना नेटवर्कमध्ये जोडण्यासही ते टाळाटाळ करत होते. रोबोटिक सर्जरी किंवा नव्या तंत्रज्ञानाच्या उपचारांमध्ये पेमेंट न देण्याची तक्रारही होती. याशिवाय, बीमा कंपन्या डॉक्टरांच्या उपचारप्रक्रियेत हस्तक्षेप करत असल्याचेही आरोप AHPI ने केले होते.
विमा कंपन्यांचा खुलासा
बजाज एलियन्झने स्पष्ट केले की त्यांनी कधीच कॅशलेस सेवा बंद केली नव्हती. काही अपवादात्मक परिस्थितींमध्ये, रुग्णाला थेट बँक खात्यामध्ये पेमेंट करण्यात आले होते. तर केअर हेल्थनेही खात्री दिली की, त्यांचे नेटवर्क हॉस्पिटल्समध्ये कोणतीही अडचण येणार नाही आणि उपचार सुरळीत सुरू राहतील.
ही कारवाई आणि चर्चेच्या यशस्वी टप्प्यांमुळे बीमा धारकांना मोठा दिलासा मिळाला आहे. यामुळे भविष्यात आरोग्य विमा कंपन्या आणि रुग्णालयांमधील संबंध अधिक पारदर्शक आणि रुग्णहिताचे होतील, अशी अपेक्षा आहे.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!