

Delhi-Pune Vistara Flight : विस्तारा या विमान कंपनीच्या विमानाला बॉम्बची धमकी दिल्यानंतर दिल्ली विमानतळावर खळबळ उडाली आहे. आज दिल्ली-पुणे विमानाला बॉम्बची धमकी मिळाली आहे. विमान पोहोचताच तपास सुरू करण्यात आला आहे. सर्व प्रवाशांना विमानातून सुखरूप उतरवण्यात आले आहे. विमानतळावरील आयसोलेशन बेमध्ये विमानाची तपासणी सुरू आहे. सर्व प्रवाशांना त्यांच्या सामानासह सुखरूप खाली उतरवण्यात आले आहे.
आज सकाळी 8.53 वाजता जीएमआर कॉल सेंटरला फ्लाइटमध्ये बॉम्ब असल्याचा फोन आला. मात्र, आतापर्यंतच्या तपासात काहीही निष्पन्न झाले नाही, ही दिलासादायक बाब आहे. विमानात कोणतीही स्फोटक किंवा संशयास्पद वस्तू सापडलेली नाही.
हेही वाचा – जडेजाच्या आमदार पत्नीला आला राग, सर्वांसमोर भांडतानाचा व्हिडिओ व्हायरल!
याआधी दिल्लीहून फ्रँकफर्ट, जर्मनीला जाणाऱ्या एअरलाइनवर गरम पेय सांडल्याने एक मुलगी जखमी झाली. त्यानंतर विस्तारा एअरलाइन्सने एक निवेदन जारी करून सांगितले की, ही घटना 11 ऑगस्ट रोजी यूके 25 या फ्लाइटमध्ये घडली. दिल्ली-फ्रँकफर्ट फ्लाइटमध्ये एक 10 वर्षीय मुलगी तिच्यावर गरम पेय सांडल्याने जखमी झाली. या मुलीच्या उपचाराचा संपूर्ण खर्च विस्तारा करणार असल्याचे कंपनीने ठरवले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 10 वर्षांची मुलगी तिच्या आई-वडिलांसोबत प्रवास करत होती. कंपनीने सांगितले की, आमच्या केबिन क्रूने मुलीच्या पालकांना विनंती केल्यावर चॉकलेट दिले होते. मूल चंचल होते, त्यामुळे गरम पाणी तिच्या अंगावर पडले. त्यानंतर आमच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने प्राथमिक उपचार केले. यानंतर, लँडिंगनंतर मुलीला तिच्या आई-वडिलांसह तातडीने रुग्णवाहिकेची व्यवस्था करून रुग्णालयात पाठवण्यात आले.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!