

Gen Z Stare : आधुनिक युगात वर्क कल्चर बदलताना दिसत आहे, पण ‘Gen Z’ म्हणजेच झी पिढीच्या एका विचित्र वर्तनामुळे सीनियर मॅनेजर्स आणि बॉस सतत दबावात येत आहेत. ‘Gen Z Stare’ – म्हणजेच काही न बोलता, सरळ नजरेने शांतपणे बघणं – हे नवीन वर्कप्लेस ट्रेंडमुळे अनेक सीनियर मॅनेजर्स अस्वस्थ होत आहेत, काहींनी तर त्याच्या तणावामुळे नोकरीही सोडली आहे.
काय आहे ‘Gen Z Stare’?
हे ट्रेंड विशेषतः नवीन पिढीच्या कर्मचाऱ्यांमध्ये दिसत आहे. एखाद्या बैठकीदरम्यान किंवा परफॉर्मन्सवर फीडबॅक देताना, Gen Z कर्मचारी कोणतीही प्रतिक्रिया न देता फक्त समोर पाहत राहतात. न संवाद, न प्रश्न. ही शांतता आणि नजरेचा ठामपणा मॅनेजर्सना गोंधळात टाकतो.
व्यवस्थापकांचा तणाव का वाढतो?
- हे वर्तन निष्क्रिय बंडखोरीसारखे वाटते.
- संवादाचा अभाव असल्याने समस्या समजत नाहीत.
- यामुळे टीम डायनॅमिक्स बिघडतात.
- काहींनी या मानसिक दबावामुळे राजीनामा दिला आहे.
हेही वाचा – Video : शुभांशु शुक्ला पृथ्वीवर परतले! भारतीय अंतराळवीराची Axiom-4 मिशननंतर यशस्वी घरवापसी
Gen Z साठी सामान्य, पण वरिष्ठांसाठी ‘रेड अलर्ट‘?
तज्ज्ञांच्या मते, Gen Z साठी ही शैली “नॉन-कन्फ्रंटेशनल कम्युनिकेशन” आहे. पण जुन्या पिढीच्या व्यवस्थापकांना ही शांतता थेट विरोध वाटतो. संवादाची ही पोकळी कंपन्यांसाठी मोठी समस्या बनतेय.
तज्ज्ञांचे मत
“दोन्ही बाजूंनी सहानुभूती हवी. व्यवस्थापकांनी संवादाच्या नवीन पद्धती समजून घ्यायला हव्यात आणि Gen Z ने देखील खुलं बोलणं शिकायला हवं,” असं करिअर कोच प्रिया मेहता सांगतात.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!