इंडिगो एअरलाइन्सचा ‘मोठा’ निर्णय, 1000 हून अधिक महिला पायलट्सना लॉटरी!

WhatsApp Group

IndiGo Airlines : देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगो एअरलाईनने एक मोठी घोषणा केली आहे. विमान कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांमध्ये महिलांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. इंडिगोने 1000 महिला वैमानिकांच्या नियुक्तीची घोषणा केली आहे. विमान कंपनीने महिला वैमानिकांची संख्या एका वर्षात 1000 च्या वर नेण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या एअरलाइनमध्ये 800 हून अधिक महिला पायलट आहेत, जे एकूण पायलटच्या केवळ 14 टक्के आहेत.

भारतीय हवाई वाहतूक क्षेत्र सतत प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे. वाढत्या विमान वाहतूक क्षेत्राचा विचार करता कंपनी महिला वैमानिकांची संख्या वाढवण्यावर भर देत आहे. इंडीओने जाहीर केले आहे की त्यांच्या कर्मचाऱ्यांमध्ये लवकरच 1000 हून अधिक महिला कर्मचाऱ्यांचा समावेश केला जाईल. याचा अर्थ असा की इंडिगोमध्ये लवकरच महिला वैमानिकांना मोठ्या प्रमाणावर नोकऱ्या मिळू लागतील.

इंडिगोने एका वर्षात 1000 हून अधिक महिला वैमानिकांना सामील करून घेण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. वैविध्य आणि सर्वसमावेशकतेला चालना देण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, एअरलाइन कंपनी इंडिगोने पुढील वर्षापर्यंत त्यांच्या कर्मचाऱ्यांमध्ये महिला वैमानिकांची संख्या 1,000 पेक्षा जास्त करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. आपल्या ताफ्याचा आणि नेटवर्कचा विस्तार करणाऱ्या या विमान कंपनीकडे सध्या 800 हून अधिक महिला वैमानिक आहेत.

व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment