

Gufi Paintal Passes Away : बीआर चोप्रा यांच्या ‘महाभारत’मध्ये शकुनी मामाची भूमिका साकारणारे अभिनेते गूफी पेंटल यांचे निधन झाले आहे. गूफी पेंटल आजारपणामुळे काही काळ रुग्णालयात दाखल होते. आज सोमवारी त्यांचे वयाच्या 79 व्या वर्षी मुंबईत निधन झाले. फरीदाबादमध्ये पेंटल यांची तब्येत बिघडली होती, मात्र त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना मुंबईला नेण्यात आले. मात्र सोमवारी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
गूफी पेंटल एक प्रसिद्ध अभिनेता होते, जे अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये दिसले. 1975 मध्ये आलेल्या ‘रफू चक्कर’ या सिनेमातून त्यांनी करिअरला सुरुवात केली. ‘दिल्लगी’, दावा, देस परदेस आणि सम्राट यांसारख्या चित्रपटांमध्ये ते दिसले आहेत. 1994 मध्ये आलेल्या ‘सुहाग’ चित्रपटात ते अक्षय कुमारच्या मामाच्या भूमिकेत दिसले होते. त्यांनी स्वतः ‘महाभारत’मध्ये शकुनीची भूमिका साकारली होती आणि ते या मालिकेचे कास्टिंग डायरेक्टर देखील होते.
'Mahabharat' actor Gufi Paintal passes away
Read @ANI Story | https://t.co/X4nEiMqR6B#GufiPaintal #Mahabharat pic.twitter.com/qiT4TqAhAG
— ANI Digital (@ani_digital) June 5, 2023
हेही वाचा – ओडिशात आणखी एक रेल्वे अपघात, मालगाडीचे 5 डबे रुळावरून घसरले! पाहा Video
#Shakunimama no more.#Gufipaintal pic.twitter.com/AUKnK0HGAU
— Shashiprasad SM (@smshashiprasad) June 5, 2023
चित्रपटांमध्ये दिसण्यापूर्वी पेंटल सैन्यात सैनिक होते. एका मुलाखतीत त्यांनी सांगितले की, ते इंजिनीअरिंगचे शिक्षण घेत असताना त्यांना कॉलेजमध्ये सैन्य भरतीची माहिती मिळाली. त्यांना नेहमी सैन्यात भरती व्हायचे होते आणि त्यांची पहिली पोस्टिंग चीन सीमेवरील आर्मी आर्टिलरीमध्ये होती.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!