लग्नानंतर लफडं..! भारतातील ‘या’ शहरात सर्वात जास्त अफेअर्स, रिपोर्ट वाचून हादराल!

WhatsApp Group

Ashley Madison Extra Marital Affairs Report India : एकेकाळी ही गोष्ट लपवून ठेवली जायची. पण आता भारतात विवाहबाह्य संबंध (Extra Marital Affairs) ‘नॉर्मल’ झालेत. Ashley Madison या प्रसिद्ध डेटिंग प्लॅटफॉर्मने 2025 साठी जो नवा अहवाल प्रसिद्ध केला आहे, त्यात काही आश्चर्यकारक गोष्टी समोर आल्या आहेत. या रिपोर्टनुसार, तमिळनाडूमधील कांचीपुरम शहराने सगळ्यांना मागे टाकत देशात सर्वाधिक एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्सचे रेकॉर्ड बनवलंय. 2024 मध्ये हे शहर 17व्या स्थानावर होतं, पण 2025 मध्ये थेट पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे.

मुंबई गायब, दिल्लीचा प्रभाव कायम

या यादीत मुंबईचा उल्लेखही नाही, जे 2024 मध्ये पहिल्या स्थानावर होतं. मात्र दिल्ली NCR चे तब्बल 9 भाग या टॉप 20 लिस्टमध्ये आहेत. यामध्ये सेंट्रल दिल्ली, साउथ दिल्ली, ईस्ट व वेस्ट दिल्ली, गुरुग्राम, गाझियाबादसारख्या भागांचा समावेश आहे.

भारतामधील टॉप 20 ‘बेवफाई’ शहरं (2025)

  1. कांचीपुरम
  2. सेंट्रल दिल्ली
  3. गुरुग्राम
  4. गौतमबुद्ध नगर
  5. साउथ वेस्ट दिल्ली
  6. देहरादून
  7. ईस्ट दिल्ली
  8. पुणे
  9. बेंगळुरू
  10. साउथ दिल्ली
  11. चंदीगड
  12. लखनऊ
  13. कोलकाता
  14. वेस्ट दिल्ली
  15. कामरूप (आसाम)
  16. नॉर्थ वेस्ट दिल्ली
  17. रायगड
  18. हैदराबाद
  19. गाझियाबाद
  20. जयपूर

काय म्हणतो कायदा?

सुप्रीम कोर्टने 2018 मध्ये IPC कलम 497 रद्द केलं आणि स्पष्ट सांगितलं की सहमत असलेला विवाहबाह्य संबंध गुन्हा नाही. मात्र, तो घटस्फोटासाठी आधार ठरू शकतो आणि मानसिक क्रूरतेच्या स्वरूपात मानला जाऊ शकतो.

विशेषज्ञ काय सांगतात?

Ashley Madison चे Chief Strategy Officer पॉल कीएबल म्हणतात, “भारत आता उघड विचार करतोय. एक्स्ट्रा मॅरिटल संबंध केवळ शारीरिक संबंध नसून, अनेकदा इमोशनल पोकळपणाचा परिणाम असतो.” मात्र ते फक्त जोडप्यांनाच नाही तर मुलांनाही मानसिकरित्या प्रभावित करू शकतात.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment