

PM Narendra Modi Record 2025 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक ऐतिहासिक विक्रम आपल्या नावे केला आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर आता मोदी देशाचे सर्वाधिक काळ पंतप्रधानपद भूषवणारे दुसरे नेते ठरले आहेत. त्यांनी इंदिरा गांधींना मागे टाकले असून 4078 दिवसांचा कालावधी पूर्ण केला आहे.
नेहरूंचा विक्रम अजून अबाधित, पण मोदींनी घेतली दुसरी जागा
पंडित नेहरू 15 ऑगस्ट 1947 ते 27 मे 1964 पर्यंत जवळपास 16 वर्षं आणि 286 दिवस पंतप्रधान राहिले. इंदिरा गांधी 4077 दिवस पंतप्रधान होत्या. आता मोदींनी 25 जुलै 2025 रोजी 4078 दिवसांचा कार्यकाळ पूर्ण करत इंदिरा गांधींना मागे टाकलं आहे.
हेही वाचा – Video : पायाला सूज, रक्त, वेदना…तरीही ऋषभ पंत लंगडत मैदानात, मग जे घडलं ते…
मुख्यमंत्री ते पंतप्रधान – विक्रमांची शृंखला
मोदी यांनी ऑक्टोबर 2001 ते मे 2014 या कालावधीत 13 वर्षांपेक्षा अधिक काळ गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून सेवा दिली. ते गुजरातचे सर्वात जास्त काळ मुख्यमंत्री राहिलेले नेते आहेत. त्यानंतर त्यांनी 2014 मध्ये पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली आणि तेव्हापासून सातत्याने सत्तेत राहून इतिहास रचला आहे.
स्वातंत्र्यानंतर जन्मलेले पहिले व विक्रम करणारे पंतप्रधान
पंतप्रधान मोदी हे स्वातंत्र्यानंतर जन्मलेले पहिले पंतप्रधान आहेत, ज्यांनी इतक्या दिर्घकाळ सत्तेत राहण्याचा विक्रम केला. ते पहिले गैर-काँग्रेसी पंतप्रधान आहेत, जे पूर्ण बहुमतासह सलग तीन वेळा सत्तेत आले. मोदी हे गैर-हिंदी भाषिक राज्यातून सर्वाधिक काळ पंतप्रधान राहणारे एकमेव नेते ठरले आहेत.
देशाचे सर्वात जास्त काळ पंतप्रधान राहिलेले नेते:
- पंडित जवाहरलाल नेहरू – 16 वर्षं 286 दिवस
- नरेंद्र मोदी – 4078 दिवस (सातत्याने चालू कार्यकाळ)
- इंदिरा गांधी – 4077 दिवस
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!