रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! ‘रेल नीर’च्या बाटल्यांची किंमत झाली स्वस्त, आता 15 रुपये नाही…

WhatsApp Group

Rail Neer Price Drop : भारतीय रेल्वेने आपल्या प्रवाशांसाठी एक आनंददायक निर्णय घेतला आहे. २२ सप्टेंबर २०२५ पासून रेल्वे स्थानकांवर आणि गाड्यांमध्ये विकल्या जाणाऱ्या ‘रेल नीर’ पाण्याच्या बाटल्यांच्या किमतीत घट करण्यात आली आहे. याआधी 1 लिटर पाण्याची बाटली 15 रुपयांना मिळत होती, परंतु आता ती फक्त 14 रुपयांना उपलब्ध होणार आहे. याचप्रमाणे, अर्धा लिटर (500ml) पाण्याची किंमत 10 रुपयांवरून 9 रुपयांवर आली आहे.

भारतीय रेल्वे मंत्रालयाच्या अधिकृत निवेदनात नमूद करण्यात आलं आहे की, ही नवीन दररचना 22 सप्टेंबरपासून संपूर्ण देशभर लागू होणार आहे. केवळ रेल नीरच नव्हे, तर स्थानकांवर आणि ट्रेन्समध्ये विकल्या जाणाऱ्या इतर ब्रँडच्या पाण्याच्या बाटल्यांवर देखील हेच दर लागू होणार आहेत.

GST 2.0 मुळे आलेले बदल

ही किंमत कपात GST 2.0 लागू होण्याआधीच करण्यात आली आहे. देशभरात 22 सप्टेंबरपासून नवीन GST दर लागू होणार असून, त्यानुसार पूर्वीचे 12% आणि 28% स्लॅब हटवून फक्त 5% आणि 18% असे दोनच स्लॅब ठेवण्यात आले आहेत. जीवनावश्यक वस्तूंवर कर कमी करण्यात आला असून, साबण, टूथपेस्ट, रोटी यांवर 5% किंवा शून्य (0%) GST लागू होईल.

हेही वाचा – पित्याचा खून करून पुरावे लपवले ‘क्राईम पेट्रोल’ पाहून, पण एका चुकीनं फुटलं सगळं!

जीवन वाचवणाऱ्या औषधांवरही कर 12% वरून 5% किंवा 0% करण्यात आला आहे, यामुळे उपचार खर्च कमी होण्याची शक्यता आहे.

‘रेल नीर’ कुठे बनते?

रेल नीर उत्पादनाची जबाबदारी IRCTC (Indian Railway Catering and Tourism Corporation) कडे आहे. यामध्ये महाराष्ट्रातील अंबरनाथ येथील रेल नीर प्लांट सध्या पश्चिम भारतातील सर्वात मोठ्या प्लांटपैकी एक आहे. हा प्लांट मुंबई लोकलच्या प्रवाशांबरोबरच महाराष्ट्र व गुजरातच्या ट्रेन प्रवाशांना पाणी पुरवतो.

वर्तमानात, हा प्लांट रोज 1.74 लाख लिटर पाणी उत्पादन करतो आणि आता याची उत्पादन क्षमता जवळपास दुप्पट केली जाणार आहे.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment