Video : शुभांशु शुक्ला पृथ्वीवर परतले! भारतीय अंतराळवीराची Axiom-4 मिशननंतर यशस्वी घरवापसी

WhatsApp Group

Shubhanshu Shukla Returns To Earth : भारतीय अंतराळ संशोधन क्षेत्रासाठी अभिमानाची बातमी आहे. भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांनी Axiom-4 या आंतरराष्ट्रीय अंतराळ मोहिमेत यशस्वी सहभाग नोंदवून पृथ्वीवर यशस्वी लँडिंग केले आहे. या मोहिमेचा भाग असलेले चारही अंतराळवीर SpaceX च्या ड्रॅगन स्पेसक्राफ्टद्वारे अमेरिकेच्या सॅन डिएगो (कॅलिफोर्निया) जवळील पॅसिफिक महासागरात भारतीय वेळेनुसार दुपारी 3.01 वाजता स्प्लॅशडाउन करत सुखरूप परतले.

Axiom-4 मोहिमेतील वैशिष्ट्ये

या मिशनचे नेतृत्व NASAच्या माजी अंतराळवीर पेगी व्हिटसन यांनी केले. शुभांशु शुक्ला यांनी या मोहिमेत पायलट म्हणून भूमिका बजावली. त्यांच्या सोबत पोलंडचे स्लावोस्ज उज़्नान्स्की विल्निविस्की आणि हंगेरीचे टिबोर कापू हे दोन मिशन स्पेशालिस्ट होते.

हेही वाचा – AI कमावतोय पैसे, तुम्ही अजून विचारात? एक Reddit युजर बनला लाखोंचा मालक!

थरारक प्रवासानंतर पृथ्वीवर आगमन

अंतराळात 22-23 तासांचा प्रवास पूर्ण केल्यानंतर ड्रॅगन स्पेसक्राफ्टने पृथ्वीच्या वायुमंडलात प्रवेश केला. ‘डी-ऑर्बिट बर्न’ या प्रक्रियेतून यानाची गती कमी करण्यात आली. वायुमंडलातून घर्षणामुळे तापमान 3,500°F पर्यंत गेले, मात्र यानातील हीट शिल्डमुळे आतली उष्णता फक्त 30°C इतकीच होती. चार पॅराशूट्सच्या मदतीने यानाची गती कमी करत ते सुरक्षितपणे समुद्रात उतरले.

पुढील टप्पे

स्पेसक्राफ्टला विशेष जहाजाच्या मदतीने समुद्रातून बाहेर काढण्यात येणार आहे. जहाजावरच सर्व अंतराळवीरांची वैद्यकीय तपासणी केली जाईल. त्यानंतर ते हेलिकॉप्टरद्वारे मुख्य तळावर आणले जातील.

भारतीय अंतराळ कार्यक्रमासाठी ऐतिहासिक क्षण

शुभांशु शुक्ला यांची ही कामगिरी भारतासाठी नवे दरवाजे उघडणारी ठरू शकते. ISRO व Axiom Space यांच्यातील सहकार्य भविष्यातील आंतरराष्ट्रीय मिशनसाठी प्रेरणा देणारे आहे.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment