

Income Tax : तुम्हीही नोकरी करत असाल, तर तुम्हीही कर बचतीचा पर्याय शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप उपयुक्त आहे. ज्या पगारदार लोकांचा पगार कराच्या कक्षेत येतो त्यांनी आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी गुंतवणूकीचे नियोजन करावे. तुम्ही आयटीआर दरम्यान ३१ मार्चपर्यंत कर बचत योजनेत गुंतवणूक करून कपातीचा दावा करू शकता.
सध्या देशात अशा अनेक योजना आहेत, जिथे तुम्ही गुंतवणूक करून कर वाचवू शकता. येथे आम्ही तुम्हाला कर बचतीच्या अशा टिप्सबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये गुंतवणूक केल्याने तुम्हाला कर सूटचा लाभ मिळेल आणि भविष्यासाठी चांगला निधी देखील तयार करू शकता.
इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम म्हणजेच (ELSS)
इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम म्हणजेच ELSS फंड ही एकमेव म्युच्युअल फंड योजना आहे ज्यामध्ये तुम्हाला गुंतवणुकीवर कर सवलतीचा लाभ मिळतो. यामध्ये तुम्हाला आयकर कलम ८०C अंतर्गत १.५ लाख रुपयांची कर सूट मिळते. तुम्ही यामध्ये १०० रुपयांच्या SIP द्वारे गुंतवणूक करू शकता. यामध्ये तुम्हाला सरासरी १० ते १२ टक्के परतावा मिळत आहे.
हेही वाचा – आता सगळ्यांची वाट लागणार..! Hyundai कडून २७ किमी मायलेज देणारी कार लाँच, किंमत फक्त ५.६८ लाख!
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF)
पब्लिक प्रॉव्हिडंट फंड म्हणजेच PPF ही दीर्घकालीन कर सवलत देण्यासाठी आजच्या काळातील सर्वात लोकप्रिय योजनांपैकी एक आहे. ही योजना आयकर कायद्याच्या कलम ८०C अंतर्गत कर लाभ प्रदान करते. तुम्ही या योजनेत वर्षभरात अनेक हप्त्यांमधून जास्तीत जास्त १.५ लाख रुपये वार्षिक गुंतवू शकता.
राष्ट्रीय पेन्शन योजना (NPS)
एनपीएस ही सरकारची कर बचत योजना आहे. ही गुंतवणूक योजना कलम ८०CCD अंतर्गत कमाल २ लाख रुपयांच्या कर कपातीची परवानगी देते. यामध्ये कलम CCD(१) अंतर्गत रु. १.५ लाख आणि CCD(१B) अंतर्गत रु. ५०,००० अतिरिक्त कर सूट समाविष्ट आहे.
भविष्य निर्वाह निधी (PF)
भविष्य निर्वाह निधी ही आणखी एक कर बचत योजना आहे, ज्यांना सेवानिवृत्तीनंतर जीवनासाठी योजना करायची आहे त्यांच्यासाठी ही योजना अधिक चांगली आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) मध्ये योगदान देणारे कर्मचारी कलम ८०C अंतर्गत कर सूट मिळवू शकतात.
विमा पॉलिसी
आरोग्य विमा योजनेत गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूकदारांना ८०D अंतर्गत सूट मिळते. यामध्ये, ८०C अंतर्गत १.५ लाख रुपयांच्या सूटशिवाय, तुम्हाला २५,००० रुपयांची अतिरिक्त सूट मिळते.