सातोशी नाकामोतो : ब्रिटनमध्ये राहणारा की जपानमधला? अख्खं जग शोधतंय याचं उत्तर!

WhatsApp Group

Satoshi Nakamoto Bitcoin Creator Mystery : ‘सातोशी नाकामोतो’ हे नाव आज संपूर्ण जगासाठी एक गूढ बनले आहे. एकच व्यक्ती आहे की लोकांचा समूह? हे आजवर कोणालाही ठाऊक नाही. मात्र, या नावाने २००८ साली एक अशी क्रांती घडवून आणली, ज्यामुळे जगाची संपूर्ण आर्थिक व्यवस्था हादरली.

सातोशी नाकामोतो यांनी २००८ मध्ये बिटकॉइनची संकल्पना मांडली आणि जगासमोर ब्लॉकचेन तंत्रज्ञान आणले. त्यांनी निर्माण केलेली ही डिजिटल चलनव्यवस्था म्हणजेच क्रिप्टोकरन्सी, सरकार किंवा बँकेच्या कोणत्याही नियंत्रणाशिवाय काम करणारी स्वतंत्र प्रणाली ठरली. आज याच बिटकॉइनचे बाजारमूल्य १०० अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक आहे, आणि ती जगातील सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी बनली आहे.

बिटकॉइनची सुरुवात कशी झाली?

३१ ऑक्टोबर २००८ रोजी सातोशी यांनी एक नऊ पानांचा शोधनिबंध प्रसिद्ध केला, “Bitcoin: A Peer-to-Peer Electronic Cash System”. या लेखामध्ये त्यांनी बँक किंवा मध्यवर्ती संस्थेशिवाय काम करणाऱ्या डिजिटल चलनाची रचना स्पष्ट केली. डिजिटल चलनातील सर्वात मोठी समस्या म्हणजे ‘डबल स्पेंडिंग’, म्हणजे एकच नाणं अनेक वेळा वापरण्याची शक्यता. सातोशी यांनी ही समस्या ब्लॉकचेनच्या मदतीने पूर्णतः सोडवली.

बिटकॉइनचा जन्म  

सातोशी यांनी पहिलं बिटकॉइन ब्लॉक, ज्याला “जेनेसिस ब्लॉक” म्हटले जाते, तयार केलं. या ब्लॉकमध्ये त्यांनी एक संदेश लिहिला होता, “The Times 03/Jan/2009 Chancellor on brink of second bailout for banks.” हा संदेश त्या काळातील आर्थिक संकट व बँकिंग यंत्रणेवरील अविश्वास दर्शवणारा होता. त्यामुळे बिटकॉइन ही केवळ एक तांत्रिक नव्हे, तर सामाजिक आणि वैचारिक क्रांतीही ठरली.

हेही वाचा – बिटकॉइनमध्ये पहिल्यांदाच गुंतवणूक करायचीये? दोनशे रुपयांत सुरू करता येईल!

सातोशी नाकामोतो कोण?

सातोशी यांची खरी ओळख आजही अज्ञात आहे. P2P Foundation या वेबसाइटवर त्यांनी स्वतःला ५ एप्रिल १९७५ रोजी जन्मलेला, ३७ वर्षांचा जपानी पुरुष म्हणून नमूद केलं होतं. मात्र, त्यांच्या लिखाणात ब्रिटिश इंग्रजीतील शब्दांचा वापर, जसे की favour, bloody, तसेच ब्रिटिश वृत्तपत्राचा दाखला दिल्यामुळे, तज्ज्ञांचा अंदाज आहे की ते ब्रिटनमधून असावेत. काही विश्लेषकांचं म्हणणं आहे की सातोशी हे लंडनमध्ये राहत होते, कारण त्यांची ऑनलाइन क्रियाशीलता GMT (ग्रीनविच मीन टाइम) नुसार होती.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment