Hurun India Under 30 List : ग्रोसरी डिलिव्हरी स्टार्टअप ‘झेप्टो’ (Zepto) चे सहसंस्थापक कैवल्य वोहरा आणि आदित पालिचा यांनी अवघ्या 22 व्या वर्षी ‘Avendus Wealth – हुरुन इंडिया अंडर 30 लिस्ट 2025’ मध्ये पहिलं स्थान पटकावलं आहे. ही यादी हुरुन इंडिया संस्थेने गुरुवारी जाहीर केली असून, त्यात 30 वर्षांखालील अशा 79 प्रेरणादायी तरुण उद्योजकांचा समावेश आहे, जे देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम घडवत आहेत.
झेप्टोची झेप
कैवल्य आणि आदित यांनी 10 मिनिटांत किराणा सामान पोहोचवणारा ‘Zepto’ स्टार्टअप सुरू केला होता. अल्पावधीतच हे स्टार्टअप देशभरात यशस्वी ठरले असून, आज Zepto हे नाव घराघरात पोहोचले आहे.
महाराष्ट्रातील आणि देशभरातील इतर उद्योजकही चमकले
- अर्जुन देशपांडे – Generic Aadhaar
- शिवा संकेश्वर – Vijayanand Travels
- ए.व्ही.आर. श्री स्मरण – AVR Swarna Mahal Jewellers
- राहुल रावत – Digantara (Space-tech)
- मिहिर मेंडा – RMZ Boston
- Swish डिलिव्हरी अॅपचे सहसंस्थापक – उज्ज्वल सुखेजा, शरण एस, अनिकेत शाह
महिला उद्योजकांनाही स्थान
या यादीत 6 महिलांना स्थान मिळाले असून, त्या AI, हेल्थकेअर, एज्युकेशन, फायनान्स आणि ब्यूटी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहेत.
प्रमुख महिला नावं:
- घोलप
- देवांशी केजरीवाल
- अनन्यश्री बिरला
- वृषाली प्रसादे
- रोमिता मजुमदार
प्रभावी आकडे:
- या तरुण उद्योजकांनी 64,000 पेक्षा अधिक रोजगार निर्माण केले आहेत.
- त्यांनी मिळवलेली एकूण गुंतवणूक $5 अब्जांहून अधिक आहे.
- ही यादी दाखवते की भारतातील स्टार्टअप्स केवळ व्हॅल्यूएशनपुरते मर्यादित नाहीत, तर व्हिजन, इनोव्हेशन आणि सामाजिक परिणाम हाही आता केंद्रबिंदू झाला आहे.
मुंबई ठरली स्टार्टअप्सची राजधानी
या लिस्टमध्ये सर्वाधिक 15 उद्योजक मुंबईहून आहेत. त्यामुळे मुंबई ही भारताची नवी स्टार्टअप राजधानी ठरत आहे.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!