IPL 2026 GT vs MI : आयपीएलचा चालू हंगामात मुंबई इंडियन्ससाठी काळ कठीण असला तरी, आजच्या गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात संघाने मोठे बदल करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. सलग पराभवांच्या मालिकेनंतर संघाने तरुण रक्ताला संधी देण्याचा निर्णय घेतला असून, आजच्या सामन्यात दोन युवा खेळाडूंनी मुंबई इंडियन्सकडून पदार्पण केले आहे.
दोन नवीन चेहरे
नाणेफेकीच्या वेळी बोलताना कर्णधार हार्दिक पांड्याने घोषणा केली की, आजच्या सामन्यात दानिश मालेवार (Danish Malewar) आणि क्रिश भगत (Krish Bhagat) हे दोन खेळाडू पदार्पण करत आहेत. विशेषतः क्रिश भगतबद्दल बोलताना हार्दिकने एक अतिशय रंजक माहिती दिली. हार्दिक म्हणाला, “क्रिश आधी आमच्या सपोर्ट बॉलरचा भाग होता. तिथे त्याने आपल्या गोलंदाजीने आम्हाला खूप प्रभावित केले. तो अवघ्या तीन दिवसांपूर्वीच मुख्य संघात सामील झाला आणि आज त्याचे नशीब पहा, तो थेट प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळत आहे.”
🚨Toss update from Ahmedabad🚨@gujarat_titans won the toss and elected to bowl first against @mipaltan
— IndianPremierLeague (@IPL) April 20, 2026
Updates ▶️ https://t.co/cawFoZABvQ#TATAIPL | #KhelBindaas | #GTvMI pic.twitter.com/sxybdSK0tS
“मुंबई इंडियन्स म्हणजे काय, हे दाखवू”
या हंगामात मुंबईची कामगिरी निराशाजनक राहिली आहे, मात्र हार्दिक पांड्याने सकारात्मकता सोडलेली नाही. तो म्हणाला, “आम्ही एक गट म्हणून एकत्र बसलो आणि मुंबई इंडियन्स नेमकी कशासाठी ओळखली जाते, यावर चर्चा केली. आम्हाला कशा प्रकारचे क्रिकेट खेळायचे आहे, हे आम्ही ठरवले आहे. कठीण काळ येतो, पण अशा वेळी एकमेकांच्या पाठीशी उभे राहणे महत्त्वाचे असते. आम्ही एकत्र जिंकतो आणि एकत्रच हरतो.”
सुधारणा करण्यावर भर
संघातील त्रुटींबद्दल बोलताना हार्दिकने स्पष्ट केले की, केवळ एका गोष्टीवर बोट ठेवता येणार नाही. संपूर्ण संघ म्हणून आम्हाला चांगली कामगिरी करण्याची गरज आहे. “आज एक नवा दिवस आहे, सूर्य पुन्हा उगवला आहे आणि आम्ही सकारात्मक विचार घेऊन मैदानात उतरलो आहोत,” असेही त्याने नमूद केले.
मुबंई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी हे दोन नवीन खेळाडू काय जादू करतात, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. विशेषतः ज्या क्रिश भगतने केवळ तीन दिवसांत नेट बॉलर ते मुख्य खेळाडू असा प्रवास केला, त्याच्या कामगिरीकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा