वैभव सूर्यवंशीला टीम इंडियापासून का राहावं लागणार वेगळं? कारण थक्क करणारं!

WhatsApp Group

Vaibhav Suryavanshi dressing room : भारतीय क्रिकेटमधील नवा सुपरस्टार वैभव सूर्यवंशी सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. १५ वर्षांच्या या युवा फलंदाजाला आता आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यात टीम इंडियाच्या इतर खेळाडूंसोबत ड्रेसिंग रूम शेअर करता येणार नाही. हे वाचून अनेकांना आश्चर्य वाटेल, पण यामागे शिस्तभंगाचं किंवा वादाचं कोणतंही कारण नाह. हा निर्णय पूर्णपणे खेळाडूंच्या सुरक्षेसाठी घेतलेला नियमित नियम आहे.

काय आहे हे नवा ICC नियम?

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) आणि इंग्लंड क्रिकेट बोर्ड (ECB) यांच्या चाइल्ड सेफगार्डिंग पॉलिसीनुसार, १६ वर्षांखालील कोणत्याही खेळाडूला प्रौढ खेळाडूंसोबत ड्रेसिंग रूम वापरण्याची परवानगी नसते. वैभव सध्या केवळ १५ वर्षांचा असल्याने हा नियम त्याला थेट लागू होतो.

याचा अर्थ असा की मॅच आणि टीम मीटिंगच्या वेळी वैभव टीम इंडियासोबत राहू शकेल, पण कपडे बदलण्यासाठी त्याला स्वतंत्र खोली वापरावी लागेल. इंग्लंडमधील पाचही मैदानांवर ही व्यवस्था केली जाणार आहे.

आई-वडील राहणार सोबत

या संपूर्ण दौऱ्यादरम्यान वैभवचे आई-वडील त्याच्यासोबत असणार आहेत, आणि टीम जिथे राहील त्याच हॉटेलमध्ये ते देखील राहतील. यामुळे या युवा खेळाडूला नव्या वातावरणात सहज जुळवून घेता येईल.

इतिहास घडवण्याच्या उंबरठ्यावर

वैभव सूर्यवंशी सध्या आयर्लंडमध्ये पोहोचला आहे, जिथे भारतीय संघ दोन T20 सामने खेळणार आहे. यानंतर इंग्लंडमध्ये पाच सामन्यांची T20 मालिका होणार आहे. आयर्लंड दौऱ्यातून आंतरराष्ट्रीय डेब्यू केल्यास, सचिन तेंडुलकरचा सर्वात युवा भारतीय क्रिकेटपटू बनण्याचा विक्रम वैभव मोडू शकतो. आणि हीच गोष्ट त्याच्याकडे जगभराचं लक्ष वेधून घेत आहे.

विशेष म्हणजे, हा नियम केवळ भारतीय क्रिकेटपुरता मर्यादित नाही. इंग्लिश स्पोर्ट्समध्ये असे नियम आधीपासून प्रचलित आहेत — आर्सेनलचा युवा खेळाडू मॅक्स डाउमन देखील १६ वर्षांचा होण्यापूर्वी अशीच वेगळी व्यवस्था वापरत असे.

IPL मध्ये राजस्थान रॉयल्ससाठी खेळताना मात्र वैभवने सीनियर खेळाडूंसोबतच ड्रेसिंग रूम शेअर केली होती, कारण भारतीय घरगुती क्रिकेट आणि IPL मध्ये असा नियम लागू नाही. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरचा हा अनुभव वैभवसाठी पूर्णपणे नवा असणार आहे.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment