युजवेंद्र चहल-धनश्री वर्माचा घटस्फोट होण्याचं कारण कदाचित ‘हे’ आहे!

WhatsApp Group

Yuzvendra Chahal Dhanashree Verma Divorce : बऱ्याच दिवसांपासून टीम इंडियातून बाहेर असलेला फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहलच्या वैयक्तिक आयुष्यात सर्व काही ठीक चालत नाहीये. चहलच्या पत्नी धनश्री वर्मासोबतच्या नात्यात मतभेद असल्याच्या बातम्या येत आहेत. दोघांनी सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो केले आहे. एवढेच नाही तर चहलने धनश्रीशी संबंधित असलेले फोटोही सोशल मीडियावरून हटवले. तेव्हापासून त्यांच्या घटस्फोटाची जोरदार चर्चा आहे. मात्र, दोघांनीही याबाबत काहीही सांगितले नाही. दरम्यान, युजवेंद्र चहल आता एका मिस्ट्री गर्लसोबत दिसला आहे. जिथे चहलनेही कॅमेरा पाहताच चेहरा लपवला.

धनश्री वर्मापासून घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान युझवेंद्र चहल एका मिस्ट्री गर्लसोबत स्पॉट झाला आहे. मुंबईतील जुहूमध्ये चहल एका मिस्ट्री गर्लसोबत दिसला होता. चहल एका मुलीसोबत कारमध्ये दिसला होता. मीडियाच्या कॅमेऱ्यांनी त्याला टिपण्याचा प्रयत्न केला तेव्हा भारतीय क्रिकेटपटूने आपला चेहरा लपवला. तेव्हापासून धनश्री आणि चहलच्या घटस्फोटाच्या बातम्यांमागे ही मिस्ट्री गर्ल कारणीभूत आहे का, अशा चर्चा सुरू आहेत.

हेही वाचा – टेस्ट क्रिकेटमध्ये होणार ‘जबरदस्त’ बदल, जय शाहंची तयारी, 2027 नंतर…

2023 मध्ये धनश्री वर्माने इन्स्टाग्रामवर तिच्या युजर नेममधून चहल हे आडनाव काढून टाकले होते. तिने एक स्टोरी देखील शेअर केली आहे. त्यानंतरही त्यांच्या नात्याबाबत विविध प्रकारच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र, लवकरच हे प्रकरण शांत झाले. पण आता दोघांचेही मार्ग वेगळे झाले आहेत. टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, दोघांचा घटस्फोट होणार हे निश्चित आहे. त्याची औपचारिक घोषणा अजून व्हायची आहे.

लॉकडाऊन दरम्यान युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांची पहिली भेट झाली. धनश्रीने एका रिॲलिटी शोमध्ये सांगितले होते की, चहलने तिच्याशी डान्स शिकण्यासाठी संपर्क साधला होता. यानंतर दोघांमध्ये मैत्री झाली आणि नंतर नात्याचे रुपांतर प्रेमात झाले. लवकरच दोघांनीही त्यांच्या नात्याला नाव दिले. चहल आणि धनश्रीचे डिसेंबर 2020 मध्ये मोठ्या थाटामाटात लग्न झाले.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment