

Best Dal For Diabetes : डायबिटीज म्हणजेच मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी योग्य आहार निवडणे फारच महत्त्वाचे असते. त्यातही भारतीय स्वयंपाकातील ‘डाळ’ रोजच्या आहारात असतेच. मग असा प्रश्न अनेकदा उपस्थित होतो की, डायबिटीज रुग्णांसाठी सर्वात सुरक्षित डाळ कोणती?
डायबिटीजसाठी सर्वोत्तम पर्याय
प्रसिद्ध आयुर्वेदिक डॉक्टर सलीम जैदी यांच्या मते, चणाडाळ ही डायबिटीजसाठी सर्वोत्तम पर्याय आहे. त्यांच्या मते, चणाडाळीचा ग्लायसेमिक इंडेक्स फक्त ८ आहे, म्हणजेच ती शरीरात हळूहळू साखर रिलीज करते. यामुळे रक्तातील साखरेची पातळी स्थिर राहते.
चणाडाळीमध्ये फायबर आणि प्रोटीन प्रचुर प्रमाणात असल्याने ती पचनासाठी उपयोगी, उर्जादायक आणि वजन कमी करण्यास मदत करणारी आहे. डॉक्टरांच्या मते, डायबिटीज असलेले रुग्ण ही डाळ पोटभर खाऊ शकतात, तरीही शुगर लेव्हल वाढत नाही.
ही डाळ चवीलाही अप्रतिम असून, तिला तडका देऊन किंवा भाज्यांसोबत बनवली, तरी सहज खाल्ली जाऊ शकते.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!