22 मुलांचा मृत्यू! Coldrif कफ सिरप बनवणाऱ्या कंपनीवर तामिळनाडू सरकारचा घणाघात, परवाना रद्द, मालक तुरुंगात

WhatsApp Group

Coldrif Cough Syrup : तामिळनाडू सरकारने Coldrif Cough Syrup प्रकरणी मोठी कारवाई करत, या कफ सिरपची निर्मिती करणाऱ्या श्रीसन फार्मास्युटिकल कंपनीचा परवाना रद्द केला आहे. या औषधामुळे मध्य प्रदेशातील तब्बल 22 मुलांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण देशभरात खळबळ उडाली होती.

राज्याच्या ड्रग्स कंट्रोल विभागाने सखोल तपास पूर्ण केल्यानंतर कंपनीचे उत्पादन थांबवून औपचारिकरीत्या बंदी घालण्यात आली आहे. तपासादरम्यान या कफ सिरपमध्ये डायएथिलीन ग्लायकॉल (DEG) या अत्यंत धोकादायक रसायनाचे प्रमाण मर्यादेपेक्षा खूप जास्त आढळले.

कंपनीचा मालक अटकेत

तामिळनाडू सरकारने केवळ कंपनीवरच नाही, तर राज्यातील सर्व औषध निर्माण कंपन्यांची तपासणी करण्याचे आदेशही दिले आहेत. या प्रकरणातील मुख्य आरोपी श्रीसन कंपनीचा मालक रंगनाथन याला मध्य प्रदेश SIT ने 9 ऑक्टोबर रोजी अटक केली असून, न्यायालयाने त्याला 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

2 ड्रग इन्स्पेक्टर निलंबित

या प्रकरणात निष्काळजीपणाचा आरोप असलेल्या 2 वरिष्ठ ड्रग इन्स्पेक्टरना निलंबित करण्यात आले आहे. मध्य प्रदेशात एका मागोमाग 22 मुलांचा मृत्यू झाल्यानंतर Coldrif Syrup वर अनेक राज्यांनी बंदी घातली होती. यानंतर एमपी सरकारने विशेष तपास पथक (SIT) स्थापन करून तपास सुरू केला. तपासात या सिरपमध्ये DEG चे विषारी प्रमाण असल्याचे स्पष्ट झाले.

हेही वाचा – शरीरात ‘धडधड’ संपली की आयुष्य संपतं? ब्रिटनच्या वैज्ञानिकांचा धक्कादायक शोध, व्यायाम करणाऱ्यांसाठी मोठा खुलासा!

राजकीय वादही पेटला

या घटनेवर भाजप नेते के. अन्नामलाई यांनी तामिळनाडू सरकारवर तीव्र टीका केली होती. घटनेचा ताण वाढल्यानंतर सरकारने तत्काळ ड्रग इन्स्पेक्टरना निलंबित केले व आता कंपनीवरच ताळा ठोकून तिचा परवाना कायमचा रद्द केला आहे.

या घटनेमागे काय आहे मोठं सत्य?

तज्ञांच्या मते, DEG हे रसायन शरीरात गेल्यास किडनी, यकृत आणि मेंदूवर गंभीर परिणाम करू शकते. अनेकदा स्वस्त उत्पादनासाठी कंपन्या हे रसायन वापरतात, पण त्याचे दुष्परिणाम जीवघेणे ठरतात. याच कारणामुळे Coldrif Syrup आता भारतात पूर्णपणे बंदीग्रस्त औषधांच्या यादीत समाविष्ट झाले आहे.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment