

Note in Phone Back Cover : भारतात बहुतेक लोकांच्या फोन कव्हरच्या मागे १०, २०, ५०, १००, ५०० च्या नोटा दिसतील. असे करणे त्यांच्यासाठी धोकादायक असू शकते. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे या नोटेमुळे तुमचा जीवही जाईल. फोनच्या मागील कव्हरमध्ये नोट ठेवणे धोकादायक का आहे ते वाचा.
कव्हरमध्ये नोट ठेवणे धोकादायक का?
जेव्हा तुम्ही फोन जास्त वेळ वापरता तेव्हा तो गरम होतो. फोन गरम होताच फोनची मागील गरम होऊ लागते. अशा परिस्थितीत, जर तुम्ही तुमच्या फोनच्या कव्हरच्या मागे नोट ठेवली असेल, तर फोनची उष्णता बाहेर पडण्यास अडथळा येतो त्यामुळे स्फोट होऊ शकतो. तसेच फोनला घट्ट कव्हर वापरू नये, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे, कारण त्यामुळे फोनचा स्फोटही होऊ शकतो.
हेही वाचा – Rahul Gandhi : राहुल गांधी ‘या’ ठिकाणाहून लढणार लोकसभा निवडणूक!
नोटांवरील रसायने
नोटा कागदापासून बनवल्या जातात आणि त्यात अनेक प्रकारची रसायने वापरली जातात. अशा परिस्थितीत, जेव्हा फोन गरम होतो आणि नोटमुळे उष्णता बाहेर पडत नाही, तेव्हा त्याला आग लागू शकते. नोटेमध्ये असलेल्या केमिकलमुळे ही आग आणखी वाढू शकते. अशा परिस्थितीत फोन कव्हरच्या मागे चुकूनही कोणत्याही प्रकारची नोट ठेवू नका आणि फोनचे कव्हर अतिशय काळजीपूर्वक लावा, कारण कव्हर जर घट्ट असेल तर फोन ब्लास्ट होऊ शकतो.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!