Petrol Diesel Price Today : पेट्रोल ८४ रुपये फक्त..! ‘या’ शहरात सर्वात स्वस्त; डिझेलचेही दर उतरले!

WhatsApp Group

Petrol Diesel Price Today : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या चढ-उताराच्या पार्श्वभूमीवर भारतीय तेल कंपन्यांनी आज, ७ डिसेंबरसाठीही पेट्रोल आणि डिझेलच्या किमती अपडेट केल्या आहेत. आज (बुधवार)ही तेलाच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचा दर स्वस्त होऊन प्रति बॅरल ८० डॉलरवर आला आहे. तर राष्ट्रीय बाजारात मे महिन्यापासून पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत.
राष्ट्रीय राजधानी दिल्लीत एक लिटर पेट्रोल ९६.७२ रुपयांना उपलब्ध आहे, तर डिझेलची किंमत ८९.६२ रुपये प्रति लिटरवर स्थिर आहे. देशातील सर्वात स्वस्त पेट्रोल पोर्ट ब्लेअरमध्ये आहे, जिथे किंमत ८४.१० रुपये आहे आणि डिझेलची किंमत ७९.७४ रुपये प्रति लीटर आहे.

मुंबईत पेट्रोल १०६.३१ रुपये प्रति लिटर दराने उपलब्ध आहे. त्याच वेळी, डिझेलची किंमत ९४.२७ रुपयांवर स्थिर आहे. चेन्नईबद्दल बोलायचे झाले तर येथे पेट्रोलचा दर ९२.७६ रुपये प्रति लिटर आहे. याशिवाय पश्चिम बंगालची राजधानी कोलकातामध्ये पेट्रोलचा दर १०६.०३ रुपये तर डिझेलचा दर ९२.७६ रुपये आहे.

शहरात पेट्रोल-डिझेलची किंमत

शहर पेट्रोल रु. प्रति लीटर डिझेल रु. प्रति लीटर
दिल्ली ९६.७२ ८९.६२
मुंबई १०६.३१ ९४.२७
चेन्नई १०२.६३ ९४.२४
कोलकाता १०६.०३ ९२.७६

 

हेही वाचा – Rashi Bhavishya 2023 : नवीन वर्षात ‘या’ तीन राशींना शनी साडेसातीपासून मुक्तता, अपार धनलाभ !

सरकारने २१ मे रोजी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केले होते. सरकारने उत्पादन शुल्कात ८ रुपयांनी तर डिझेलवर ६ रुपयांनी कपात केल्याने देशभरात पेट्रोल ९.५० रुपये आणि डिझेल ७ रुपयांनी स्वस्त झाले आहे. त्यानंतर राष्ट्रीय स्तरावर दरात कोणताही बदल झालेला नाही. राज्यस्तरीय करांमुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर राज्यानुसार बदलतात.

दररोज दर अपडेट केले जातात..

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींचा आढावा घेतल्यानंतर दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोल आणि डिझेलचे दर जारी केले जातात. यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारचे कर, मालवाहतूक खर्च आणि डीलर कमिशन यांचा समावेश आहे.

तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलची किंमत अशा प्रकारे तपासा..

तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलची किंमत फक्त एका एसएमएसद्वारे जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार, यासाठी तुम्हाला RSP<space>डीलर कोड ९२२४९ ९२२४९ वर एसएमएस करावा लागेल.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment