

Petrol Diesel Price Today : जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत सुरू असलेल्या चढ-उताराच्या पार्श्वभूमीवर सरकारी तेल कंपन्यांनी शुक्रवारी सकाळी पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किमती जाहीर केल्या. आज अनेक राज्यांमध्ये तेलाच्या किमतीत बदल झाला आहे. मात्र, चेन्नई, कोलकाता या देशातील चार महानगरांमध्ये आजही तेलाच्या किरकोळ किमतीत कोणताही बदल झालेला नाही.
कच्च्या तेलाबद्दल बोलायचे झाले तर गेल्या २४ तासात त्याच्या किमतीत थोडा बदल झाला आहे. ब्रेंट क्रूडची किंमत थोडी कमी झाली आहे आणि प्रति बॅरल $७५. ४६ वर चालू आहे. जागतिक बाजारात डब्ल्यूटीआयचा दरही घसरून प्रति बॅरल $६९.४५ झाला आहे.
चारही महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर
– दिल्लीत पेट्रोल ९६.६५ रुपये आणि डिझेल ८९.८२ रुपये प्रति लिटर
– मुंबईत पेट्रोल १०६.३१ रुपये आणि डिझेल ९४.२७ रुपये प्रति लिटर
– चेन्नईमध्ये पेट्रोल १०२.६३ रुपये आणि डिझेल ९४.२४ रुपये प्रति लिटर
– कोलकातामध्ये पेट्रोल १०६.०३ रुपये आणि डिझेल ९४.७६ रुपये प्रति लिटर
हेही वाचा – ऐका हो ऐका..! Hero Splendor ‘या’ तारखेपासून महागणार; आता वाढणार ‘इतकी’…
पेट्रोल-डिझेलचे दर रोज अपडेट होतात
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील कच्च्या तेलाच्या आधारावर तेल विपणन कंपन्या दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींचा आढावा घेऊन दर निश्चित करतात. तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर तुम्हाला एसएमएसद्वारे दररोज कळू शकतात. यासाठी इंडियन ऑइलच्या (IOCL) ग्राहकांना RSP कोड ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवावा लागेल. तुमच्या शहराचा RSP कोड जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!