

Petrol Diesel Price Today : काल जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यानंतर देशातील तेल कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलचे दर निश्चित केले आहेत. काल जागतिक तेल बेंचमार्क ब्रेंट क्रूड 0.10 टक्क्यांनी वाढून $76.45 प्रति बॅरलवर पोहोचले. कच्च्या तेलाच्या दरात वाढ होऊनही तेल कंपन्यांनी आजही दरात वाढ केलेली नाही. गेल्या वर्षी मे महिन्यापासून राष्ट्रीय स्तरावर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही.
मेट्रो शहरांमध्ये दर
- नवी दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर दराने उपलब्ध आहे.
- कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर दराने उपलब्ध आहे.
- मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर दराने उपलब्ध आहे.
- चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर दराने उपलब्ध आहे.
फोनवर माहिती कशी मिळवायची?
तेल कंपन्या दररोज सकाळी 6 वाजता जागतिक तेलाच्या दरानुसार देशातील प्रत्येक लहान-मोठ्या शहरांसाठी तेलाचे दर अपडेट करतात. देशातील विविध तेल कंपन्यांपैकी एक असलेल्या इंडियन ऑइलने आपल्या वापरकर्त्यांना पेट्रोल आणि डिझेलचे नवीनतम दर फोनवर मिळवण्याची सुविधा दिली आहे.
हेही वाचा – WTC Final : स्टीव्ह स्मिथ झाला थक्क, तोंड राहिलं उघडं! पाहा Video
तुम्ही तुमच्या फोनवरून RSP <space> पेट्रोल पंप डीलरचा कोड टाइप करून 92249 92249 वर एसएमएस पाठवू शकता आणि तुम्हाला तेलाच्या नवीनतम किंमती मिळतील. तथापि, दिल्लीतील रहिवाशांना ही माहिती मिळवायची असल्यास, ते RSP 102072 वर 92249 92249 टाइप करून एसएमएसद्वारे अद्यतनित दर जाणून घेऊ शकतात.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!