

Sawan 2025 Snake Sighting Meaning : श्रावण महिना सुरू झाला की, संपूर्ण वातावरणात भक्तिभावाचं होतं. “ॐ नमः शिवाय” च्या गजरात न्हालेलं आसमंत आणि भोलेनाथाच्या भक्तांची अखंड पूजा-अर्चा यामुळे या महिन्याला एक विशेष आध्यात्मिक स्थान आहे. याच काळात जर कोणाला नागाचे (सापाचे) दर्शन घडलं, तर तो केवळ एक जीव नसून, ते एक ईश्वरी संकेत असल्याचं मानलं जातं.
नाग हे शिवाच्या कृपेचे प्रतीक!
ज्योतिष शास्त्रानुसार, नाग दर्शनाला भयकारक घटना म्हणून न पाहता, आध्यात्मिक जागृतीचा संकेत मानला जातो. श्रावण महिन्यात जर नाग दिसला, तर हे एक प्रकारचं देवतांचं आशीर्वादचं प्रतिक असतं. लोकमान्यतेनुसार, अशावेळी शिव आपल्या भक्ताच्या भक्तीवर प्रसन्न होऊन कृपाछाया करतात.
सफेद नागाचं दर्शन — अत्यंत शुभ आणि दुर्मिळ!
जर कोणाला सफेद नाग दिसला किंवा स्वप्नात आला, तर तो शिवाच्या विशेष कृपेचा अद्वितीय संकेत मानला जातो. याचा अर्थ असा होतो की तुमच्या जीवनातील अडथळे दूर होणार आहेत, किंवा तुम्ही आध्यात्मिक उन्नतीच्या दिशेने वाटचाल करत आहात.
हेही वाचा – डाळ, भाजी आणि इंधन स्वस्त! महागाईने घेतली माघार; जनता खूश!
भीती नसावी!
श्रावणात नाग दर्शन झाल्यावर घाबरण्याची गरज नाही. हा क्षण म्हणजे शिवाचं स्मरण करण्याची, त्यांचे आभार मानण्याची वेळ आहे. सांप जर शिवाच्या गळ्यातला आभूषण असतील, तर त्यांचं दर्शन म्हणजे खुद्द शिवांची उपस्थितीचं भान देणारं आहे.
टीप
वरील लेख धार्मिक आणि सांस्कृतिक मान्यतांवर आधारित असून, यात दिलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानवर्धनासाठी आहे. कृपया याचा अंधश्रद्धा म्हणून गैरवापर करू नका. वैयक्तिक किंवा वैद्यकीय सल्ल्यासाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!