ओठ सुंदर करण्याचा प्रयत्न, आली भीषण सूज,  हे ‘लिप फिलर’ नक्की काय असंत?

WhatsApp Group

Urfi Javed Lip Filler : फॅशन आणि सौंदर्यविश्वात कायमच चर्चेत असलेली उर्फी जावेद पुन्हा एकदा चर्चेत आली. पण यावेळी कारण तिच्या बोल्ड फॅशन स्टाईलपेक्षा वेगळं आहे. उर्फीने अलीकडेच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली असून, त्यामध्ये तिने “लिप फिलर” काढल्यानंतर चेहऱ्यावर सूज आल्याचा धक्कादायक अनुभव सांगितला.

लिप फिलर म्हणजे काय?

लिप फिलर ही एक कॉस्मेटिक प्रक्रिया आहे. यामध्ये हायलुरॉनिक अ‍ॅसिडसारख्या घटकांचा वापर करून ओठांमध्ये इंजेक्शनद्वारे भर दिला जातो, जेणेकरून ओठ अधिक जाडसर, भरदार आणि आकर्षक दिसतात. ही प्रक्रिया काही मिनिटांत पूर्ण होते आणि त्याचे परिणाम लगेचच दिसू लागतात.

लिप फिलर का आणि कधी करून घेतात?

  • ओठ अधिक आकर्षक व उठावदार दिसावेत यासाठी
  • वय वाढल्यामुळे ओठांतील नैसर्गिक भर कमी झाल्यावर
  • फोटो किंवा कॅमेऱ्यात चांगले दिसण्यासाठी
  • सौंदर्य वाढवण्यासाठी एक झटपट उपाय म्हणून

 लिप फिलर हटवण्याची गरज का भासते?

  • ओठांमध्ये असमान आकार
  • अनावश्यक सूज किंवा घट्टपणा
  • नैसर्गिक लुक न मिळणे
  • साइड इफेक्ट्स किंवा अ‍ॅलर्जी

अशावेळी हायलुरोनिडेस नावाचा एंजाइम वापरून लिप फिलर हटवले जातात, जे शरीरात सहजपणे शोषले जाते.

उर्फी जावेदला काय त्रास झाला?

उर्फीने सांगितलं की तिने खूप मोठ्या प्रमाणात लिप फिलर वापरले होते, ज्यामुळे तिचा चेहरा आणि लुक बिघडला. फिलर काढल्यानंतर ओठ आणि चेहरा सुजल्यामुळे तीला खूप त्रास सहन करावा लागला. तिने सूजलेल्या चेहऱ्याचे फोटोही सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

लिप फिलरचे संभाव्य धोके काय?

  • अ‍ॅलर्जिक रिअ‍ॅक्शन
  • रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा
  • ओठांचा असममित आकार
  • संसर्ग होण्याचा धोका

(टीप  : वरील माहिती ही विविध माध्यमांच्या रिपोर्ट्सवर आधारित आहे. सौंदर्यविषयक कोणतीही कॉस्मेटिक प्रक्रिया घेण्याआधी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment