

Chhatrapati Shivaji Maharaj forts UNESCO : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणारे महाराष्ट्रातील १२ ऐतिहासिक किल्ले आता जागतिक दर्जा मिळवून युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत (UNESCO World Heritage Sites) समाविष्ट झाले आहेत. हा निर्णय आज युनेस्कोने अधिकृतपणे जाहीर केला असून त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहाचे वातावरण आहे.
कुठले किल्ले झाले सामील?
युनेस्कोच्या यादीत समाविष्ट झालेल्या १२ किल्ल्यांमध्ये खालील किल्ल्यांचा समावेश आहे:
- रायगड
- राजगड
- शिवनेरी
- प्रतापगड
- सिंधुदुर्ग
- विजयदुर्ग
- लोहगड
- जिंजी
- साल्हेर
- पन्हाळा
- खांदेरी
- सुवर्णदुर्ग
छत्रपती शिवाजी महाराजांचे १२ किल्ले युनेस्को जागतिक वारसा नामांकन यादीत समाविष्ट झाल्याबद्दल महाराष्ट्रातील जनतेचे हार्दिक अभिनंदन!
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) July 12, 2025
महाराष्ट्र शासनाचा छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा!#छत्रपतीशिवाजीमहाराज#युनेस्को#WorldHeritage@UNESCO pic.twitter.com/k2oEyJ9Xl6
हे सर्व किल्ले शिवाजी महाराजांच्या लढाऊ धोरणांचे आणि स्वराज्य स्थापनेच्या इतिहासाचे जीवंत प्रतीक मानले जातात. या यादीत प्रसिद्ध किल्ले विशाळगड आणि सिंहगड यांना स्थान मिळालेले नाही.
महाराष्ट्रासाठी गौरवशाली क्षण!
— Piyush Goyal (@PiyushGoyal) July 11, 2025
छत्रपती शिवाजी महाराजांचे १२ किल्ले @UNESCO च्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट होणे, ही प्रत्येक मराठा आणि देशवासीयांसाठी गौरवाची गोष्ट आहे.
या ऐतिहासिक मान्यतेसाठी पंतप्रधान @NarendraModi जी, मुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी, उपमुख्यमंत्री… pic.twitter.com/1AJnmWXF0w
युनेस्कोचा दर्जा विशेष का?
युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत स्थळाचा समावेश झाल्यावर त्या जागेचे संरक्षण, संवर्धन व जागतिक प्रसिद्धी वाढते. या निर्णयामुळे या किल्ल्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्थान मिळणार असून, पर्यटन, इतिहास आणि रोजगाराच्या दृष्टीनेही मोठा फायदा होणार आहे.
“हे फक्त किल्ल्यांचे नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राच्या अभिमानाचे यश आहे. शिवप्रेमींना, इतिहासप्रेमींना आणि पर्यटकांना यामुळे आणखी आकर्षण मिळेल”, अशा प्रतिक्रिया समोर आल्या आहेत.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!