

CM Eknath Shinde On Christmas : आज म्हणजेच २५ डिसेंबरला ख्रिसमस नाताळ आहे. जगभरातील ख्रिस्ती बांधव हा सण मोठ्या आनंदानं साजरा करतात. भारतामध्येही सर्वधर्मीयांकडून ख्रिसमस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी केक कापून, मित्रांना आणि नातेवाईकांना भेटवस्तू देऊन ख्रिश्चन बांधव ख्रिसमस साजरा करतात. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रभू येशू ख्रिस्त यांचा जन्मोत्सव नाताळनिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
शुभेच्छा संदेशात मुख्यमंत्री म्हणतात की, प्रभू येशू ख्रिस्तांनी जगाला शांती, प्रेमाचा संदेश दिला. यातून प्रेरणा घेऊन आपण एकमेकांचा आदर करूया, परस्परांची काळजी घेऊया. ख्रिस्त जन्मोत्सवाचे हे पर्व सर्वांच्या आयुष्यात सुख,समृद्धी आणि सौहार्दाचे क्षण घेऊन येवो यासाठी हार्दिक शुभेच्छा.
#नाताळ सणाच्या हार्दिक शुभेच्छा…#MerryChristmas pic.twitter.com/NRJKq3BSeh
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) December 25, 2022
राज्यपालांकडूनही शुभेच्छा
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी जनतेला नाताळ निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. “नाताळचा सण भगवान येशू ख्रिस्तांच्या प्रेमळ, संयमी, क्षमाशील व धीरोदात्त जीवनाचे स्मरण देतो. हा सण सर्वांच्या जीवनात सुख, शांती, समाधान व संपन्नता घेवून येवो, या सदिच्छेसह सर्वांना नाताळ तसेच नववर्षानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो,” असे राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
*Governor Koshyari greets people on Christmas*
The Governor of Maharashtra Bhagat Singh Koshyari has greeted the people of Maharashtra and Goa on the occasion of Christmas. In a message to the people of Maharashtra, the Governor said,
“
— Jayprakash Singh ( India Tv ) (@jayprakashindia) December 24, 2020