Mumbai Rojgar Melava 2023 : नोकरी हवीय? मुंबईत ‘या’ ठिकाणी रोजगार मेळावा; नक्की वाचा!

WhatsApp Group

Mumbai Rojgar Melava 2023 : सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात अनेकजण आहेत. मात्र, कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी सर्वांपासून चुकते. त्यामुळेच ‘वाचा मराठी’नं पुढाकार घेत, नोकरीची, रोजगाराची संधी आणि त्याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा एक प्रयत्न केला आहे. त्यामुळं नोकरीची गरज असलेला तरुणवर्ग खालील ठिकाणी अर्ज करु शकतील.

मुंबई उपनगर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत शनिवार दिनांक २५ फेब्रुवारी २०२३ रोजी सेंट फ्रान्सिस आयटीआय माऊंट पोनसूर, एस. व्ही. रोड, हिरालाल भगवती हॉस्पिटलजवळ, बोरिवली (पश्चिम), मुंबई येथे सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते या मेळाव्याचा शुभारंभ होईल.

हेही वाचा – IPL 2023 : ‘हा’ विश्वविजेता खेळाडू बनला सनरायझर्स हैदराबादचा नवा कॅप्टन..! वाचा

या मेळाव्यात विविध नामांकित कंपन्या, उद्योग, कॉर्पोरेट संस्था व नियोक्त्यांकडून रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. मेळाव्यात रिक्त पदांसाठी पात्रतेप्रमाणे उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात येणार आहेत. याशिवाय विविध शासकीय आर्थिक विकास मंडळेही मेळाव्यात सहभागी होणार असून त्यांच्यामार्फत स्वयंरोजगारासाठी विविध समाज घटकांकरीता राबविण्यात येणाऱ्या कर्ज योजनांची माहिती देण्यात येणार आहे. दहावी, बारावी उत्तीर्ण, आयटीआय, पदवीधर, अभियंते अशा विविध क्षेत्रातील नोकरी इच्छुक उमेदवारांनी या संधीचा लाभ घेण्यासाठी मेळाव्यात सहभागी व्हावे, असे आवाहन मुंबई उपनगर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त प्र. वा. खंडारे यांनी केले आहे.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment