

Nalasopara Traffic Police : नालासोपाऱ्यातून एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. एका माणसानं महिला ट्रॅफिक पोलिसाच्या अंगावर बाईक घालून तिला फरफटत नेले. या घटनेत महिला पोलीस कर्मचारी जखमी झाली. या घटनेनंतर वकिलाने शिवीगाळही केली आणि पोलीस कर्मचारी दादागिरी करत असल्याचा आरोपही केला. संबंधित वकिलाला पोलिसांनी अटक केली. त्याची बाईक जप्त करण्यात आली आहे.
नक्की काय घडलं?
नालासोपारामध्ये एक होंडा एक्टिव्हा स्कूटी नो पार्किंमध्ये लावलेली असल्या कारणानं पोलिसांनी उचलली. ही स्कुटी चौकीत आणण्यात आली. ट्रॅफिक पोलिसांनी आपली बाईक उचलल्याचं वकिल ब्रिजेशकुमाररला कळले. तो रागारागात आपली गाडी घेऊन पोलिसांच्या चौकीतून निघू लागला. इतरांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. महिला पोलिसाने बाईकसह वकिलाला रोखण्यासाठी चौकीचे गेट लावण्याचा प्रयत्न केला. पण त्याने चौकीच्या गेटलाही जोरात धडक दिली आणि नंतर महिला पोलिसाच्या अंगावरच गाडी घातली. इतकेच नाही, वकिलाने पोलिसाला फरफटत नेले.
हेही वाचा – प्रसिद्ध भारतीय YouTuber अपघातात ठार..! ट्रकनं बाईकला दिली धडक
नो पार्किंगमधून गाडी उचलल्यानं वकिलानं महिला पोलिसाच्या अंगावर घातली गाडी 😱#vachamarathi #viralvideo #nalasopara #trafficpolice pic.twitter.com/z7dQGJEEfd
— Vacha Marathi (@VachaMarathi) September 28, 2022