

मुंबई : महाराष्ट्रातील सांगली येथे वडिलांसोबत पानाचं दुकान चालवणाऱ्या संकेत सरगर (Sanket Sargar) यानं कॉमनवेल्थ गेम्स २०२२ (Commonwealth Games 2022) मध्ये आपली ताकद दाखवून वेटलिफ्टिंगच्या ५५ किलो वजनी गटात रौप्यपदक जिंकलं. मात्र, त्यानं वडिलांना सुवर्णपदक मिळवून देण्याचं वचन दिलं होतं. पण, त्याला रौप्यपदक जिंकता आलं. मुलाच्या या पदकानं वडीलही खूश आहेत. या यशानंतर संकेतला त्याचे वडील महादेव सरगर यांना दिलेलं वचन आठवतं.
काय म्हणाला संकेत?
संकेत म्हणाला, ”माझं हे पदक कुटुंबाचं नशीब बदलणारे ठरेल, अशी आशा आहे. माझ्या वडिलांनी आता पान दुकान चालवावं असे मला वाटत नाही.” २१ वर्षीय संकेत एकेकाळी त्याच्या वजन गटात सुवर्णपदक जिंकताना दिसत होता. पण कोपराच्या दुखापतीमुळं क्लीन आणि जर्कचे दोन प्रयत्न अयशस्वी झाल्यानं त्याचं सुवर्णपदक जिंकण्याचं स्वप्न भंगलं. त्यानं एकूण २४८ किलो (११३+ १३५ किलो) वजन उचललं आणि दुसरे स्थान पटकावलं.
𝙂𝙧𝙞𝙩. 𝙋𝙖𝙞𝙣. 𝙂𝙡𝙤𝙧𝙮. 👊
Sanket Sargar refused to give up even after hurting his right elbow on the second clean and jerk lift 💪
Terrific commitment from the 21-year-old @birminghamcg22🥈medallist 👏#EkIndiaTeamIndia | #B2022 | #TeamIndia pic.twitter.com/8IND1SEqi0
— Team India (@WeAreTeamIndia) July 30, 2022
संकेत म्हणाला, ”रौप्यपदक जिंकल्यानंतर मी माझ्या वडिलांशी आणि आईशी बोललो. माझे वडील म्हणाले, ”सुवर्णपदक आलं असतं तर बरं झाले असतं, पण मला आनंद आहे.” हे पदक जिंकल्यानंतर माझ्या आयुष्यात काय बदल होतात ते पाहू. कारण माझ्या वडिलांनी मला सांगितलं होतं, सुवर्णपदकानं नशीब बदलतं. माझ्या यशानं माझे आई-वडीलही आनंदी आहेत आणि मला सतत प्रेरित करतात. पण, सुवर्ण हे सुवर्ण असतं.”
हेही वाचा – Commonwealth Games 2022 : टीम इंडियाच्या जर्सीवर अशोकचक्र का नाही? ‘हे’ आहे कारण!
“माझ्या वडिलांनी पानाचं दुकानं चालवावं असं मला वाटत नाही”
“असे खूप खेळाडू आहेत ज्यांचं जीवन एक पदक जिंकल्यानंतर बदललं. सरकारनं आतापर्यंत खूप मदत केली आहे. आता मला माझ्या पालकांना मदत करायची आहे. माझ्या वडिलांनी पान दुकान चालवावं असे मला वाटत नाही. त्यांनी माझ्यासाठी खूप त्याग केला आहे. आज मी जिथं पोहोचलो आहे, त्याचे सर्व श्रेय माझ्या वडिलांना जातं. मी माझं पदक माझ्या वडिलांना समर्पित करतो. ही माझ्या प्रवासाची सुरुवात आहे. मला माहीत आहे की अजून बराच पल्ला गाठायचा आहे”, असं संकेत म्हणाला.
Heartiest Congratulations to Sanket Sargar for clinching India’s first medal🥈 at #CommonwealthGames2022
We are very proud! #Cheer4India🇮🇳#India4CWG2022 #weightlifting pic.twitter.com/4SitX6rZee— Lokesh Sharma (@_lokeshsharma) July 30, 2022
संकेतनं स्नॅच फेरीत वर्चस्व राखलं, परंतु कोपराला दुखापत झाल्यानं आणि तीव्र वेदना होत असल्यानं क्लीन अँड जर्कमध्ये तो पहिला प्रयत्न करू शकला. दुसऱ्या आणि तिसऱ्या प्रयत्नात १३९ किलो वजन उचलण्यात तो अपयशी ठरला. मलेशियाच्या बिन मोहम्मद अनिकनं तिसऱ्या आणि अंतिम क्लीन अँड जर्क प्रयत्नात एकूण १४२ किलो वजन उचलून सुवर्णपदक जिंकलं.