

Final Team India Squad For Cricket World Cup 2023 : 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकाचे बिगुल लवकरच वाजणार आहे. ही स्पर्धा 5 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. पण त्याआधी सर्व 10 संघांना 2-2 सराव सामने खेळायचे आहेत. या स्पर्धेसाठी सर्व 10 देशांनी आधीच आपले संघ जाहीर केले आहेत. मात्र या पथकातील बदलांची अंतिम तारीख 28 सप्टेंबर ठेवण्यात आली होती. अशा परिस्थितीत भारतीय संघाने या दिवशी आपल्या संघात मोठा बदल करून अंतिम संघ घोषित केला आहे. दुखापतीने त्रस्त असलेला स्टार अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलला वगळण्यात आले आहे.
अक्षरच्या जागी ऑफस्पिनर रवीचंद्रन अश्विनचा संघात समावेश करण्यात आला आहे. अलीकडेच अश्विनला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतही संधी देण्यात आली होती, जिथे त्याने दमदार कामगिरी केली होती. मालिकेतील तिसर्या आणि शेवटच्या वनडेपर्यंतही अक्षर तंदुरुस्त होऊ शकला नाही. भारतीय संघाला विश्वचषकापूर्वी 2 सराव सामने खेळायचे आहेत. संघाला 30 सप्टेंबर रोजी गुवाहाटी येथे इंग्लंडविरुद्ध पहिला सराव सामना खेळायचा आहे. यासाठी अश्विनसह संपूर्ण टीम गुवाहाटीला पोहोचली आहे.
सराव सामन्यासाठी भारतीय संघ गुवाहाटीला
विश्वचषकापूर्वी सर्व सराव सामने गुवाहाटी, तिरुअनंतपुरम आणि हैदराबाद या तीन ठिकाणी खेळवले जातील. भारतीय संघ 3 ऑक्टोबरला नेदरलँड्सविरुद्ध दुसरा सराव सामना खेळणार आहे. हा सामना तिरुअनंतपुरमच्या ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल स्टेडियमवर होणार आहे.
हेही वाचा – Viral Video : मराठी महिलेला मुंबईत ऑफिससाठी जागा नाकारली! वातावरण पेटलं
हे सर्व सराव सामने दुपारी 2 वाजल्यापासून खेळवले जातील, तर संघाच्या सर्व 15 खेळाडूंना यात सहभागी होण्याची परवानगी असेल. 5 ऑक्टोबरपासून भारतात वर्ल्ड कप 2023 सुरू होणार आहे. ज्यामध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात 14 ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर महान सामना खेळवला जाणार आहे. तर अंतिम सामना 19 नोव्हेंबरला होणार आहे. 2023 मध्ये मायदेशात होणाऱ्या विश्वचषकात टीम इंडियाला पुन्हा एकदा विजेतेपदावर कब्जा करायचा आहे.
विश्वचषक स्पर्धेसाठी भारताचा अंतिम संघ :
रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, जसप्रीत बुमराह, शुभमन गिल, केएल राहुल, हार्दिक पंड्या (उपकर्णधार), श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, इशान किशन, सूर्यकुमार यादव, रवीचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी आणि शार्दुल ठाकूर.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!