Disney+Hotstar Free Plan : क्रिकेट चाहत्यांसाठी खुशखबर! वर्ल्ड कप आणि आशिया चषकाचे सामने पाहता येणार मोफत

WhatsApp Group

Disney+Hotstar Free Plan : डिस्ने प्लस हॉटस्टारने क्रिकेट चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. आशिया चषक आणि आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी मोबाईल वापरकर्त्यांना सबस्क्रिप्शनची गरज भासणार नाही, असे कंपनीने जाहीर केले आहे. याचा अर्थ तुम्ही हॉटस्टार अॅपवर आशिया चषक आणि विश्वचषकाचे सामने मोबाईलवर विनामूल्य पाहू शकाल. याआधी थेट क्रिकेट सामने पाहण्यासाठी होस्टरवर वर्षभरासाठी काही किंमत मोजावी लागत होती.  आशिया कपचे लाइव्ह स्ट्रीमिंग हॉटस्टार वर होईल. हॉटस्टारकडे त्यानंतरच्या एकदिवसीय विश्वचषकाचे स्ट्रीमिंग अधिकार देखील आहेत.

आयपीएलच्या रेकॉर्डब्रेक प्रेक्षकसंख्येनंतर, डिस्ने स्टारने निर्णय घेतला आहे की ते मोबाइल वापरकर्त्यांसाठी विश्वचषक आणि आशिया चषक सामन्यांचे सदस्यत्व ठेवणार नाही. कंपनीचा दावा आहे की ५४० दशलक्षाहून अधिक मोबाइल वापरकर्त्यांना याचा फायदा होईल, ते विनामूल्य मोबाइलवर सामना पाहू शकतील.

डिस्ने+ हॉटस्टारवर शुल्क न आकारण्याचा निर्णय “क्रिकेटचा खेळ अधिकाधिक लोकांपर्यंत नेणे” हा आहे. याद्वारे, कंपनीने भारतातील अधिकाधिक मोबाइल वापरकर्त्यांसाठी क्रिकेट आणि डिस्ने+ हॉटस्टार स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म दोन्ही अधिक सुलभ बनवण्याची योजना आखली आहे.

गेल्या वर्षीपर्यंत, भारतात खेळली जाणारी जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग IPL चे लाइव्ह स्ट्रीमिंग देखील Disney Plus Hotstar वर होते. परंतु यावर्षी, डिस्ने स्टारने केवळ टेलिकास्टचे अधिकार राखून ठेवले होते, तर स्ट्रीमिंग बोली जिओने जिंकली होती. यावेळी जिओ सिनेमावर आयपीएलचे सामने मोफत स्ट्रीम होत होते.

आशिया चषकाचे वेळापत्रक येणे बाकी, यजमानपदाबद्दल शंका

क्रिकेट आशिया चषक पाकिस्तानात होणार होता, पण सुरक्षेच्या दृष्टीने बीसीसीआयला आपला संघ तिथे पाठवायचा नव्हता. आशिया चषक पाकिस्तानच्या बाहेर होणार असल्याचेही स्पष्ट झाले आहे. आशिया चषक ज्या ठिकाणी होऊ शकतो तेथे श्रीलंकेचे नाव आघाडीवर आहे. आशिया चषक स्पर्धेचे संपूर्ण वेळापत्रक अद्याप आलेले नाही. भारतात होणार्‍या आशिया कपचे लाइव्ह स्ट्रीमिंग हॉटस्टारवर होणार आहे.

हेही वाचा – WTC Final 2023 : आई गं…! भारताच्या खेळाडूचा हात मोडता मोडता वाचला, पाहा Video

क्रिकेट विश्वचषक २०२३ भारतात होणार आहे

क्रिकेट विश्वचषक 2023 भारतात होणार आहे, जो ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान खेळवला जाईल. विश्वचषकाला चार महिनेही शिल्लक नाहीत. २०१९ च्या विश्वचषक स्पर्धेचे वेळापत्रक १३ महिने आधीच आले होते यावरून त्याच्या वेळापत्रकातील विलंबाचा अंदाज लावला जाऊ शकतो. २०१५ विश्वचषक स्पर्धेचे वेळापत्रक १८ महिने अगोदर जाहीर करण्यात आले होते. विश्वचषकाचे वेळापत्रक पुढील आठवड्याच्या अखेरीस येऊ शकते. बीसीसीआयने वेळापत्रक आयसीसीला सादर केल्यानंतर, आयसीसी इतर संघ आणि प्रसारकांशी देखील चर्चा करेल.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment