IND Vs AUS 1st T20 : 6,6,6..! शेवटच्या षटकात हार्दिक पंड्याचा धुमाकूळ; पाहा VIDEO

WhatsApp Group

IND Vs AUS 1st T20 : मोहालीमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात टी-२० मालिकेचा पहिला सामना खेळवला जात आहे. या सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला २० षटकात ६ बाद २०८ धावा उभारल्या आहेत. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आरोन फिंचने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना स्वस्तात गमावले असले, तरी केएल राहुल (५५), सूर्यकुमार यादव आणि शेवटी हार्दिक पंड्या (नाबाद ७१) यांनी धावा चोपल्या. हार्दिकने शेवटच्या षटकात षटकारांची हॅट्रिक केली.

6,6,6..!

हार्दिकनं शेवटच्या म्हणजेच २०व्या षटकात लागोपाठ तीन षटकार ठोकले. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज कॅमेरून ग्रीनने हे षटक टाकले. भारताने या षटकात २१ धावा चोपल्या. त्यापैकी हार्दिकने शेवटच्या तीन चेंडूवर तीन षटकार ठोकले. पहिला षटकार त्याने डीप मिड विकेट, दुसरा लाँग ऑफ आणि तिसरा डीप बॅकवर्ड पॉईंटच्या वरून ठोकला. यासह भारताने टी-२० क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध प्रथमच दोनशेपार धावसंख्या उभारली. हार्दिकने या सामन्यात ३० चेंडूत ७ चौकार आणि ५ षटकारांसह नाबाद ७१ धावा केल्या. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट २३६.६७ असा होता.

हेही वाचा – IND Vs AUS 1st T20 : मोहालीत माहोल..! केएल राहुलनं ठोकला ‘लय भारी’ SIX; पाहा VIDEO

हार्दिकची इनिंग पाहण्यासाठी इथं क्लिक करा!

दोन्ही संघांची Playing 11

भारत : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल आणि उमेश यादव.

ऑस्ट्रेलिया : आरोन फिंच (कर्णधार), कॅमेरून ग्रीन, स्टीव्ह स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, जोश इंग्लिश, टिम डेव्हिड, मॅथ्यू वेड (विकेटकीपर), पॅट कमिन्स, नॅथन एलिस, अॅडम झम्पा, जोश हेझलवूड.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

 

Leave a comment