VIDEO : इंग्लिश फलंदाजाचा खतरनाक ‘दिलस्कूप’, चेंडू सीमापार!

WhatsApp Group

भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या जात असलेल्या तिसऱ्या (IND vs ENG 3rd Test) कसोटी सामन्यात इंग्लंडचा सलामीचा फलंदाज बेन डकेटने शानदार फलंदाजी करताना शतक झळकावले. त्याने हे शतक केवळ 88 चेंडूत पूर्ण केले आहे. डकेटने राजकोटमध्ये डावाच्या सुरुवातीपासूनच भारताविरुद्ध बॅझबॉल शैलीत फलंदाजी सुरू केली आणि भारतीय भूमीवर पहिले शतक पूर्ण केले. भारतीय भूमीवर कोणत्याही इंग्लिश फलंदाजाचे हे सर्वात जलद शतक आहे. भारतीय भूमीवर परदेशी फलंदाजाचे हे दुसरे सर्वात जलद शतक आहे. या यादीत पहिल्या क्रमांकावर ॲडम गिलख्रिस्ट आहे ज्याने केवळ 84 चेंडूत शतक झळकावले.

कसोटी क्रिकेटमध्ये 500 विकेट्स पूर्ण करण्याची संधी अश्विनला मिळाली. त्याने इंग्लंडचा सलामीवीर जॅक क्रॉलीला रजत पाटीदारकरवी झेलबाद केले. त्यानंतर ओली पोप फलंदाजीला आला. बेन डकेटच्या शतकानंतर पोपनेही मोठे फटके खेळायला सुरुवात केली. त्याचा एक फटका म्हणजे दिलस्कूप. श्रीलंकेचा दिग्गज फलंदाज तिलकरत्ने दिलशान या फटक्यासाठी प्रसिद्ध आहे. पोपने रवींद्र जडेजाच्या चेंडूवर रिव्हर्स दिलस्कूप (Ollie Pope Dilscoop) खेचला.

हेही वाचा – IND V ENG : अश्विनच्या चुकीमुळे संपूर्ण भारतीय संघाला दंड!

भारताचा पहिला डाव

तत्पूर्वी, भारताचा पहिला डाव 445 धावांवर संपला. आज भारताने पाच विकेट्सवर 326 धावांवर खेळण्यास सुरुवात केली आणि 119 धावा जोडण्यासाठी उर्वरित पाच विकेट गमावल्या. पहिल्या अर्ध्या तासात टीम इंडियाने कुलदीप यादव (4) आणि रवींद्र जडेजा (112) यांच्या विकेट्स गमावल्या. यानंतर रविचंद्रन अश्विनने ध्रुव जुरेलसोबत आठव्या विकेटसाठी 77 धावांची भागीदारी केली. ही भागीदारी रेहान अहमदने मोडली. त्याने आधी अश्विन (37) आणि नंतर ध्रुव जुरेल (46) यांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. यानंतर जसप्रीत बुमराहने सिराजसोबत 10व्या विकेटसाठी 30 धावांची भागीदारी केली. वुडने बुमराहला बाद केले आणि भारतीय डाव 445 धावांवर आटोपला. इंग्लंडकडून वुडने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. तर रेहानला दोन विकेट्स मिळाल्या. जेम्स अँडरसन, टॉम हार्टले आणि जो रूट यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment