

IND vs ENG Semi Final 2 : सुप्रीम फॉर्मात खेळणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाने टी-20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात धडक दिली आहे. त्यांनी सेमीफायनलमध्ये इंग्लंडचा 68 धावांनी फडशा पाडला. गयानामध्ये पावसाच्या व्यत्ययात सेमीफायनलची सुरुवात झाली. टॉस जिंकून इंग्लंडने भारताला फलंदाजीचे आमंत्रण दिले. रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव यांच्या योगदानाच्या जोरावर भारताने इंग्लंडला 172 धावांचे आव्हान दिले. चेंडू टप्पा पडल्यानंतर खाली राहणाऱ्या आणि फिरकीपटूंसाठी उपयुक्त अशा खेळपट्टीवर भारताने जबरदस्त फलंदाजी केली. पण प्रत्युत्तरात इंग्लंडचा अभ्यास कमी पडला.
भारताच्या अवघड आव्हानापुढे इंग्लंडला निभाव लागला नाही. त्यांनी 72 धावांत 7 विकेट्स गमावल्या. इंग्लंडकडून कप्तान जोस बटलरने 23, हॅरी ब्रुकने 25 धावा केल्या. भारताचे फिरकीपटू अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांनी 3-3 विकेट्स काढल्या. भारताने क्षेत्ररक्षणातही कमाल केली, दोन रनआऊट केले. इंग्लंडचा संपूर्ण संघ 103 धावांत आटोपला. भारताकडून जसप्रीत बुमराहने 2 विकेट्स काढल्या.
Such a 𝙨𝙬𝙚𝙚𝙩 wicket by #Bumrah to send 𝙎𝙖𝙡𝙩 packing! 🔥
— Star Sports (@StarSportsIndia) June 27, 2024
Which bowler will pick the next wicket❓#SemiFinal2 👉 #INDvsENG | LIVE NOW | #T20WorldCupOnStar (only available in India) pic.twitter.com/OgKyVFHf54
हेही वाचा – सुरू होतं मोटरसायकल ऑपरेशन, मुसळधार पावसात उभे राहिले भारताचे आर्मी चीफ, व्हिडिओ व्हायरल
𝙄𝙣𝙩𝙤 𝙏𝙝𝙚 𝙁𝙞𝙣𝙖𝙡𝙨! 🙌 🙌#TeamIndia absolutely dominant in the Semi-Final to beat England! 👏 👏
— BCCI (@BCCI) June 27, 2024
It's India vs South Africa in the summit clash!
All The Best Team India! 👍 👍#T20WorldCup | #INDvENG pic.twitter.com/yNhB1TgTHq
रोहित शर्माची पुन्हा दणकेबाज सुरुवात…
रोहित शर्माची दणकेबाज सुरुवात पुन्हा एकदा भारतीय संघाला चांगल्या धावसंख्येकडे घेऊन गेली. गयानाच्या कठीण खेळपट्टीवर स्थिरावत रोहितने लागोपाठ दुसरे अर्धशतक झळकावले. रोहितने 6 चौकार आणि 2 षटकारांसह 57 धावा केल्या. रोहितला सूर्यकुमार यादवची साथ लाभली. सूर्याने 4 चौकार आणि 2 षटकारांसह 47 धावा केल्या. मधल्या फळीत हार्दिकने एक चौकार आणि 2 षटकारांसह झटपट 23 धावा केल्या. तिसरा षटकार मारण्याच्या नादात तो झेलबाद झाला. शेवटी रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल यांच्या स्फोटक खेळीच्या जोरावर टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध 20 षटकात 7 गडी गमावून 171 धावा फलकावर लावल्या. अवघड खेळपट्टीवर अखेरच्या दोन षटकांत दोघांनी मिळून 24 धावा केल्या.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा