IND vs PAK : रोहित शर्माने जिंकला टॉस, ‘प्रिन्स’चं कमबॅक! पाहा Playing 11

WhatsApp Group

IND vs PAK Toss Playing 11 in Marathi : विश्वचषक 2023 (World Cup 2023) मधील सर्वात मोठा सामना आज (14 ऑक्टोबर) भारत आणि पाकिस्तान यांच्यात रंगत आहे. वनडे विश्वचषकात दोन्ही कट्टर प्रतिस्पर्धी संघ सात वेळा आमनेसामने आले आहेत. सात वेळा भारतीय संघाने पाकिस्तानचा वाईट पद्धतीने पराभव केला आहे. दोन्ही देशांमधील हा एकूण 135 वा एकदिवसीय सामना आहे. याआधी दोन्ही देशांमध्ये 134 सामने खेळले गेले आहेत. भारताने 56 सामने जिंकले आहेत, तर पाकिस्तानने 73 सामने जिंकले आहेत. विशेष म्हणजे वनडे विश्वचषकात जेव्हाही दोन्ही देश आमनेसामने आले आहेत, तेव्हा सातही वेळा भारताने पाकिस्तानचा पराभव केला आहे. आजच्या सामन्यात भारताचा कप्तान रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. शुबमन गिलचे संघात कमबॅक झाले असून इशान किशन बाहेर आहे.

12 एप्रिल 2005 रोजी नरेंद्र मोदी स्टेडियमवर (तत्कालीन मोटेरा) भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK News In Marathi) या दोघांमध्ये एकदाच सामना झाला होता. पाकिस्तानच्या इंझमाम उल हकने सचिन तेंडुलकरच्या शेवटच्या चेंडूवर चौकार मारून पाकिस्तानला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. प्रथम खेळताना, सचिन तेंडुलकरच्या 123 धावांमुळे भारताने 315/6 (48) धावा केल्या होत्या. पाकिस्तानसाठी इंझमामने 60* (59) धावांची मॅच-विनिंग इनिंग खेळली होती.

हेही वाचा – World Cup 2023 : न्यूझीलंडकडून बांगलादेशचाही फडशा, विल्यमसनचे डॅशिंग कमबॅक!

दोन्ही संघांची Playing 11 (IND vs PAK Update)

भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर.

पाकिस्तान : अब्दुल्ला शफीक, इमाम-उल-हक, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), सौद शकील, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, हसन अली, शाहीन आफ्रिदी, हारिस रौफ.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment